आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोटा - गंगानगरी गुलाबाने बुंदी जिल्ह्यातील एका गावाच्या नागरिकांचे आयुष्य पालटवले आहे. एकट्या नोताडा भोपत गावात 500 हेक्टरवर सध्या गुलाब शेती केली जाते. दरवर्षी पिकांसाठी घेतले जाणारे कष्ट यातून कमी झाले आहेत. त्याबरोबर उत्पन्नही सहापटींनी वाढले आहे. सुरुवातीस एका वर्षामध्ये जे शेतकरी एका हेक्टरमध्ये 15 हजार रुपये उत्पन्न काढत होते, त्यांचा हा आकडा एक लाखापर्यंत गेला आहे.
पाच वर्षांत संपूर्ण हाडौती गावात गुलाब शेती अडीच ते तीनपटीने वाढली आहे. या गावातील शेतकरी सुरुवातीस तांदूळ व गव्हाची शेती करत होते. मात्र, बेभरवशाचा मान्सून आणि योग्य वेळेत कॅनॉलचा पाणीपुरवठा होत नसल्याने शेतक-यांना नुकसान सोसावे लागत होते. दीड दशकापूर्वी माजी सरपंच प्रभूलाल यांना गंगानगरी गुलाब शेतीच्या प्रयोगाची माहिती मिळाली. आवश्यक माहिती घेतल्यानंतर त्यांनी दोन हेक्टरमध्ये गुलाब शेती सुरू केली. यातून अन्य ग्रामस्थांनाही प्रेरणा मिळाली. यानंतर गावातील गुलाब शेती बहरत गेली. गावात आता 70 ट्रॅक्टर्स आहेत. शेतक-यांनी पक्की घरे बांधली आहेत. नोताडा भोपतचे उपसरपंच धनराज कुशवाहा या संदर्भात म्हणाले, गुलाब तोडणीतून लोकांना रोजगार मिळू लागला. सकाळी दोन तास कामाच्या बदल्यात प्रत्येक मजूर महिन्याकाठी 800 रुपयांपर्यंत कमाई करू शकतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.