आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K: बुरखा घालून आलेला दहशतवादी अटक, श्रीनगरमध्‍ये दाखवले पाकचे झेंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्‍या पुलवामामध्‍ये शुक्रवारी पोलिसांवर फायरिंग करून पळ काढलेल्‍या दहशतवाद्याला अटक करण्‍यात आले आहे. हा दहशतवादी बुरखा घालून होता. श्रीनगरमध्‍येही पाकिस्‍तानचे झंडे दाखवण्‍यात आले. यामध्‍ये 12 युवकांच्‍या गटाचा सहभाग असल्‍याचे सांगितले जात आहे. एका पोलिस अधिका-याने याविषयी माहिती दिली.
एका दहशतवाद्याचा शोध
पोलिस अधिका-याने सांगितले की, स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्‍या जवानांना काही दहशतवाद्यांची माहिती मिळाली होती. त्‍यानंतर या टीमने एका संशयीत दहशतवाद्याचा पाठलाग केला. जवानांनी त्‍याला रोखण्‍याचा प्रयत्‍न केला, तेव्‍हा त्‍याने थेट फायरिंग सुरू केली. त्‍यामुळे दोन जवान जखमी झाले आहेत. रेहती आणि रियाज अहमद तेली अशी जखमींची ओळख पटली आहे. घटनेनंतर बुरख्‍यात असलेल्‍या या दहशतवाद्याला जवानांनी ताब्‍यात घेतले आहे. पोलिस आणि सीआरपीएफच्‍या टीमने परिसराची छापेमारी सुरू केली आहे. सुत्रांच्‍या माहितीनुसार या परिसरात आणखी एक दहशतवादी लपून बसला आहे. त्‍याचा शोध सध्‍या घेण्‍यात येत आहे.
नमाजानंतर दाखवले पाकिस्‍तानचे झेंडे
दुसरीकडे श्रीनगरच्‍या नौहट्टा परिसरात नमाजनंतर जामिया मशिदबाहेर पाकिस्तानी झेंडे दाखवण्‍यात आले. येथूनच पोलिसांवर दगडफेकही करण्‍यात आली. अशा घटना वारंवार घडत असून तीन महिन्‍यांमध्‍ये दहापेक्षा अधिक वेळा पाकिस्‍तानचे झेंडे दाखवण्‍यात आले आहेत.
या घटनांमागे 12 युवकांचा गट
ISIS आणि पाकिस्तानचे झेंडे दाखवण्‍याच्‍या घटना वारंवार घडत असून, यामागे 12 युवकांच्‍या एका गटाचा हात असल्‍याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली आहे. इंटेलिजेंस इनपुट आणि सीसीटीव्‍ही कॅमे-यातून मिळालेले फुटेज व फोटोच्‍या आधारे या गटाशी संबंधित युवकांची ओळख पटवण्‍यात आली आहे, त्‍यांच्‍यावर सातत्‍याने लक्ष ठेवण्‍यात येत आहे. या ग्रुपला पैसे कोठून मिळतात याचाही शोध घेण्‍यात येत असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, श्रीनगरमध्‍ये पाकिस्तानचे झेंडे दाखविले..