आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावाच्या चितेवर पडली जिवंत गाय, भयभयीत झालेल्या तरूणाने असे वाचवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - वाराणसीतीली सर्वात मोठे स्मशान महाकर्णिका घाटावर एक गाय १० फूट उंच ज्वाळा निघत असलेल्या चीतेवर पडली. यानंतर लोकांची पळापळ सुरु झाली, ज्याच्या भावाच्या चीतेवर गाय पडली त्या जौनपूरच्या सभाजीतने सीआरपीएफ जवानाच्या मदतीने गायीला बाहेर काढले.
भावाच्या चीतेवर पडलेली गाय पाहून भयभीत झालो...
- सभाजीतने सांगितले, माझा मोठा भाऊ जियावन यादवच्या चीतेला अग्नि दिल्यानंतर दूर जाऊन बसलो होतो.
- अचानक एक गाय जळत्या चीतेवर पडली आणि होरपळू लागली. लाकडामध्ये गायीचे तोंड अडकले होते.
- एकीकडे माझ्या भावाची चीता पेटलेली होती आणि दुसरीकडे एक जिवंत गाय महास्माशनावरील एका व्यक्तीच्या चितेवर जळत होती, हे दृष्य पाहून मी भयभीत झालो.
- माझा भाऊच मला 'गायीला वाचव' असा आवाज देत असल्याचा भास झाला आणि मी धावलो.
- तिथे पडलेल्या मोठ्या रॉडच्या मदतीने मी गायीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गायीचे वजन जास्त होते. माझ्या एकट्याने ती हलत नव्हती.
- तेवढ्यात इतरही लोक मदतीला धावले. त्यांच्या मदतीने गायीला बाहेर काढले.
अनवाणी पायाने पेटलेल्या लाकडांवर चढलो..
- सीआरपीएफ जवाना एस. चौहान म्हणाले, मी जेव्हा गायीला वाचवण्यासाठी धावलो तेव्हा बूट पायातून निसटला आणि शेजारी जळत असलेल्या चितेत पडला आणि जळला.
- अनवणी पायांनी मी जळत्या लाकडांवर चढलो, गायीला पकडून बाहेर ओढले.
- सीआरपीएफ जवान आझमगडवरुन आजोबाचे पार्थिव घेऊन आला होता, त्यांची चिताही तिथेच जळत होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गायीला कसे काढले गेले जळत्या चितेतून बाहेर...
बातम्या आणखी आहेत...