आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Burning T Shirt Youth Throw On Gir, Incident In Allhabad University

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळता ‘टी शर्ट’ तरुणाने मैत्रिणीच्या अंगावर फेकला, अलाहाबाद विद्यापीठातील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यापीठ परिसरात बुधवारी रस्ता रोको करताना संतप्त विद्यार्थींनी. - Divya Marathi
विद्यापीठ परिसरात बुधवारी रस्ता रोको करताना संतप्त विद्यार्थींनी.

अलाहाबाद - अलाहाबाद विद्यापीठाच्या जे. के.इन्स्टिट्यूटमधील एका विद्यार्थिनीवर तिच्या मित्राने जळता टी शर्ट फेकल्याची संतापजनक घटना घडली. महिला वसतिगृहाच्या दारातच या मित्राने दिवसाढवळ्या हे कृत्य केले. या घटनेत विद्यार्थिनी 20 टक्के भाजली आहे. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे तरुण-तरुणी दोघेही बिहारचे असून एकाच गावातील आहेत. दरम्यान, हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यापीठातील विद्यार्थिनींनी बुधवारी उग्र निदर्शने केली.


पाटणा जिल्ह्यातील मसौदी गावातील रहिवासी ही तरुणी जे.के. इन्स्टिट्यूमध्ये बी. टेक. करते. मंगळवारी ती वर्गामध्ये आलीच नाही. इन्स्टिट्यूटच्या कल्पना चावला महिला वसतिगृहात ती राहते. तिच्याच गावातील विशांत ऊर्फ मुन्ना यादव हा अलाहाबाद पॉलिटेक्निक महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. दोघेही एकमेकांना चांगले ओळखतात. मंगळवारी हल्ला केल्यानंतर घाबरलेल्या मुन्नाने आग विझवण्याचाही प्रयत्न केला. पोबारा करण्याच्या प्रयत्नात असताना आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.


प्रेमाचा त्रिकोण
ही तरुणी आणि मुन्ना एकाच गावचे रहिवासी आहेत. मुन्नाचे तिच्यावर प्रेम होते, परंतु या दोघांचाही रूपेश नावाचा आणखी एक मित्र आहे. रूपेश सुरत येथे शिक्षण घेतो. तरुणी व रूपेश फेसबुक व फोनवर नेहमी गप्पा मारत असल्याचे पाहून मुन्नाचे पित्त खवळायचे. मंगळवारी मुन्ना आणि ती तरुणी दुपारी दीड वाजेच्या सुमारास होस्टेलसमोर बोलत उभे होते. तरुणीच्या हातात कपडे भरलेली बॅग होती. संतापाने खदखदत असलेल्या मुन्नाने पेट्रोलमध्ये बुडवलेला टी शर्ट सोबत आणला होता.


पाठ वळताच मुलीचा घात झाला
होस्टेलच्या दारात दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. ती मागे वळताच मुन्नाने पेट्रोलमध्ये भरलेला टी शर्ट पेटवून तिच्या अंगावर फेकला. पेटता शर्ट अंगावर पडताच तरुणीचे केस आणि पाठीवरच्या बॅगने पेट घेतला. अचानक झालेल्या हल्ल्याने तरुणी पळत सुटली. प्रथम मुन्नाने व नंतर परिसरातील विद्यार्थी, लोक तिच्या मदतीकरिता धावले व आग विझवली.