आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पीड ब्रेकरवरून पलटलेली विद्यार्थ्यांची बस 40 फूट खोल कोसळली, PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुहला चीका - मंगळवारी सायंकाळी पंजाब सीमेच्या जवळ विद्यार्थ्यांनी भरलेली एक खासगी बस (पीबी-13-8357) घग्गर नदीमधअये कोसळली. चीका रोडवर रामनगरच्या जवळ हा अपघात झाला. सरदार बस सर्व्हिसेसगी ही बस स्पीड ब्रेकरमुळे पलटली आणि पुलाचे रेलिंग तोडून 40 फूट खोल नदीत कोसळली. बसमध्ये पटियाला आणि आसपासच्या शाळांचे सुमारे 62 विद्यार्थी आणि शिक्षक होते. पटियालाहून रोहतकला एका चर्चासत्रासाठी हे विद्यार्थी जात होते. अपघातामध्ये संदीप कौर नावाच्या एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर 50 विद्यार्थी जखमी आहेत.
बसचा वेग अधिक असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर आसपासच्या शेतांमध्ये काम करणा-या मजुरांनी या विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले.

पुढील स्लाइड्सवर पाहा दुर्घटनेचे PHOTOS
कॅप्शन - बस नदीत कोसळल्यानंतर गावक-यांनी मुलांना बाहेर काढले.