आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बद्रीनाथहून केदारनाथला जाताना औरंगाबादच्या यात्रेकरूंची बस दरीत काेसळली; 3 ठार, 24 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री/ खामगाव- निधोना व पाडळी (ता. फुलंब्री) येथील ३५ भाविकांची बस उत्तराखंड राज्यातील कणप्रयाग (जि. चामाेली) गावाजवळ दरीत काेसळून तीन जण ठार झाले, तर २४ जण जखमी झाले. केदारनाथचे दर्शन अाटाेपून बद्रीनाथकडे जात असताना हा अपघात झाला. जखमींना हेलिकॉप्टरने श्रीनगर व डेहराडून येथील रुग्णालयात हलवण्यात अाले अाहे. ढगुबाई साबळे (५५), भागुबाई तुळशीराम साबळे (५०, रा. पाडळी) या दाेन मृतांचीच अाेळख पटली अाहे.

निधोना व पाडळी येथील ३५ भाविक १० जुलै रोजी  एका खासगी बसने यात्रेसाठी गेले होते. शुक्रवारी केदारनाथहून परतत असताना त्यांची बस दरीत काेसळली. अपघाताचे गांभीर्य पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात अाहे. सदर अपघातात जखमी झालेल्या २० भाविकांना पुढील उपचारासाठी श्रीनगरला, तर चार जणांना डेहराडून येथील रुग्णालयात हेलिकाॅप्टरद्वारे हलवण्यात अाल्याची माहिती सहप्रवाशांनी दिली. अपघाताचे वृत्त कळाल्यानंतर फुलंब्रीत यात्रेकरूंचे नातेवाईक काळजीत पडले हाेते.
बातम्या आणखी आहेत...