आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bus Caught Fire After Touching Electric Wire, Eight Killed In Jharkhand

झारखंड : हायटेंशन तारमुळे प्रवासी बसला लागली आग, आठ प्रवासी जळून ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : हायटेन्शन वायर पडल्यानंतर बसला आग लागली होती.

रांची - झारखंडमध्ये प्रवासी वाहतूक करणा-या एका बसला हायटेंशन तार कोसळल्याने आग लागली. या दुर्घटनेत 8 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेत अनेकजण गंभीररित्या जखमीही झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांसह एका बालकाचाही समावेश आहे.
रविवारी पलामू जिल्ह्यात ही घटना घडली. ही बस प्रवाशांना घेऊन छत्तीसगडच्या रायगडमधून बिहारच्या औरंगाबादकडे जात होती. या बसच्या टपावर एक सायकल ठेवलेली होती. सकाळी सुमारे 10.50 वाजता विश्रामपूरजवळ एक हायटेंशन तार साइकलमध्ये अडकली. त्यानंतर बसमध्ये करंट पसरला. लोकांना काही कळण्याआधीच या बसमध्ये आग लागली. त्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

मृतांची ओळख पटलेली नाही
मृतांबाबत अद्याप ओळख पटलेली नाही. काही जखमींवर विश्रामपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीररित्या जखमींना मेदिनीनगरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मृतांच्या संख्येत वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आधीही घडल्या आहेत घटना
स्थानिकांच्या मते, विश्रामपूर आणि जवळपासच्या काही भागांमध्ये रस्त्यांवर अनेक ठिकाणी हाय टेंशन वायर लटकलेल्या आहेत. त्यामुळे अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडत राहतात. चार दिवसांपूर्वीच विश्रामपूरमध्ये वीजेच्या तारेमुळे एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला होता.

पुढे पाहा, घटनेनंतरची छायाचित्रे...