आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव टुरिस्ट बसची कारला भीषण धडक, 100 फुटांपर्यंत फरपटत नेली कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर - कान्हा नॅशनल पार्कमध्ये फिरल्यानंतर कारने भेडाघाटला येत असलेले एक कुटुंब अपघातग्रस्त झाले. या अपघातात ड्रायव्हरसह 5 जण जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, मंडला येथून फुलसागर पार करताच बंजारी घाटासमोर बस-कारमध्ये ही भीषण धडक झाली. तथापि, सुदैवाने या अपघातात कुणाचा जीव गेला नाही. अपघात एवढा भयंकर होता की, कार धडकल्यानंतरही ती तब्बल 100 फूट फरपटत राहिली.
 
कसा झाला अपघात?
- बंजारी घाटासमोरून येत असलेल्या वेगवान बस (नं. एमपी 42 1007) च्या ड्रायव्हरचे संतुलन ढळले.
- बस थेट कारवर (एमएच 31 एफए 2144) चढली.
- घटनेत कारमध्ये स्वार मुंबई ठाणेचे राहणारे 42 वर्षीय चंद्रशेखर रामदास जुंझदारे, 31 वर्षीय वर्षा, 12 वर्षीय आर्या, 6 वर्षीय अरजिस गंभीर जखमी झाले.
- कार चालवणारे नागपूरचे विनोद उइके स्टिअरिंगमध्ये जाऊन फसले. त्यांना पाऊण तासानंतर काढण्यात आले. 
- सर्वांना रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
- याप्रकरणी बस ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...