आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बस नदीत कोसळली, सात ठार, 28 बेपत्ता तर 23 गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळी पोलिस आणि मदतकार्य करणारे पथकाचे सदस्य. - Divya Marathi
घटनास्थळी पोलिस आणि मदतकार्य करणारे पथकाचे सदस्य.
शिमला - मणिकर्ण मार्गावर सरसाडीजवळ 60 प्रवासी असलेली एक बस गुरुवारी सायंकाळी पार्वती नदीत कोसळली. त्यापैकी सात जण ठार झाले असून 23 जणांची स्थिती गंभीर असून त्यांना कुल्लूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 28 जण अजूनही बेपत्ता आहेत. बस कोसळली तेव्हा जखमींच्या किंकाळण्याचा आवाज ऐकून लोक मदतीसाठी पोहोचले होते.

बस (पीबी-19एच-3085) पंजाबच्या बरनालहून प्रवाशांना घेऊन निघाली होती. आनंदपूर साहीबहून मणिकर्ण साहीबकडे दर्शनासाठी भाविकांना घेऊन जात होती. तेव्हाच हा अपघात झाला.

बसचे तुकडे
या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, सरसाडीमध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे आधी बस डोंगराला जाऊन धडकली आणि नंतर 300 फूट खोल पार्वती नदीत कोसळली. यामुळे बसचे तुकडे झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. काही लोक धक्क्यामुळे बाहेर फेकले गेले. अजूनही 28 जण बेपत्ता असून ते वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच मदत पथके घटनास्थळी पोहोचली. जिल्हा प्रशासन, एसएसबी, होमगार्ड, ITBP आणि एनजीओच्या कार्यकर्त्यांनी नदीच्या किनाऱ्यावर अडकलेल्या काही जणांना रुग्णालयात पोहोचवले.
नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्याने नेमका काहीही अंदाज लागत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी अंधार पडल्याने बचावकार्य थांबवण्यात आले, त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले.

हेल्पलाइन
प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी काही हेल्पलाइनक्रमांक सुरू करण्यात आले आहेत. 94180-18787, 94180-67223, 94180-89107, 94180-11118 हे प्रमुख अधिका-यांचे मोबाईल क्रमांक असून त्यावर माहिती मिळू शकेल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO
बातम्या आणखी आहेत...