मधुबनी- बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात एक प्रवाशी तलावात बुडाली आहे. बसमध्ये 50 प्रवाशी होते. चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शोधमोहीम सुरु आहे. दुर्घटनाग्रस्त बस मधुबनीहून सितामडीला जात होती.
चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने बस तलावात कोसळली. तलावाचे पात्र खूप खोल असल्याने बस पाण्यात पूर्णपणे बुुडाली आहे. सौनहोली मोईन येथील तलावाजवळ सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
घटनास्थळी पोलिस उशीरा पोहोचल्याने संंतापले गावकरी...
मिळालेली माहिती अशी की, घटनास्थळी पोलिस नेहमीप्रमाणे उशीरा पोहोचले. त्यामुळेे गावकरी संंतापले आणि त्यांनी पोलिसावरच हल्ला केला. गावकर्यांनी पोलिसांवर चप्पल, दगडफेक करून संंताप व्यक्त केला. यादरम्यान, बचाव कार्याच्या अॅम्बुुलन्सची देखील जमावाने तोडफोड केली.