आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बसवर पडली 11 हजार वोल्टची उच्चदाबाची तार, 3 प्रवासी ठार तर 12 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - उत्‍तर प्रदेशच्या ओरिया जिल्ह्यात रविवारी सकाळी एका खासगी बसवर 11 हजार वोल्ट उच्चदाबाची तार पडल्याने तीन लोकांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. ही बस किसनीवरून फफूंद जात होती. तार पडल्यानंतर या बसला आग लागली. विद्यूत विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले.

असी घडली दुर्घटना
प्रत्यक्षदर्शी्ंकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये जवळपास 70-80 प्रवासी प्रवास करत होते. ही बस विधुना तहसीलमधील किसनीवरून फफूंदला जात होती. रस्त्यामध्ये डिझेल भरण्यासाठी ही बस विवेक पेट्रोल पंपावर थांबली. त्यानंतर डिझेल भरून मागे होताच बसवर 11 हजार वोल्टची तार पडली.

पेट्रोल पंप कर्मचार्‍यांनी सांगितले की, पंपाजवळ काम सुरू असल्याने रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे तेथील रस्ता खाली-वर आहे. यामुळेच गाडी मागे येताच एका ठिकाणी उंच झाली आणि खांबावरून लटकणार्‍या उच्चदाबाच्या तारेला चिटकली. पाहता पाहता या बसने पेट घेतली. आग लागताच आसपासच्या परिसरात गोंधळ उडाला. बसमधील प्रत्येक जण जीव वाचवत बसच्या बाहेर निघाला, मात्र ही आग इतक्यालवकर वाढली की, त्यामुळे तिघांना उतरण्याची संधीही मिळाली नाही आणि जागीच त्यांना जीव गमावावा लागला.
विद्यूत विभागाचा हलगर्जीपणा, कनिष्ठ अभियंता निलंबित
ओरियाचे पोलिस निरिक्षक अखिलेश कुमार चौरसिया म्हणाले की, विद्यूत विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली. त्यामुळे विद्यूत विभागाने त्यांच्या कनिष्ठ अभियंत्याला निलंबित केले आहे.
एका स्थानिक रहिवासी रतन पोरवाल यांनी सांगितले की, दुर्घटनेची माहिती मिळल्यानंतरही कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. गावकर्‍यांनीच मदत करून प्रवाशांना बाहेर काढले. खांबावर लटकणारे हे तार महिन्याभरापासून लटकत आहे. अनेक तक्रारी करूनही विद्यूत विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे या घटनेला विद्यूत विभागच सर्वस्वी जबाबदार आहे.


पुढील स्लाईडमध्ये पाहा, दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओ..