आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bus Hanging At 300 Feet Of Ditch Udaipur Rajasthan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

300 फूट खोल दरीत लोंबकळली बस, 30 मिनटे अडकले होते 30 प्रवाशांचे जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - चीरवा घाटात गुरुवारी एक ट्रॅव्हल्स बस 300 फूच खोल दरीत कोसळण्यापासून बालंबाल बचावली. राँग साईडने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसने दरीची सुरक्षाभिंत तोडली. त्यामुळे बस आर्धी दरीत आणि आर्धी रस्त्यावर अशी लोंबकळली होती. त्यामुळे अर्धा तास प्रवाशांचा जीव जणू धोक्यात अडकला होता. सगळ्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ सुरू झाला होता. ही बस सूरतहून गंगापूर भीलवाडा येथे जात होती.
या अपघातानंतर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बसला सुरक्षितपणे बाजुला काढून जप्त केली आहे. फरार झालेला चालक सायंकाळी पोलिस ठाण्यात पोहोचला त्याला पोलिसांनी अटक केली.
दोन इंचांनी वाचली बस
दरीत लोंबकळलेली बस जर आणखी दोन इंच पुढे गेली असती तर तिचे बाजुचे दुसरे चाकही समोर गेले असते. तशा परिस्थितीमध्ये बसला कोणत्याही परिस्थितीच वाचवणे शक्य झाले नसते.
रस्त्याच्या बाजुने होते दार
बसचे दार रस्त्याच्या बाजुने असल्याने प्रवासी क्रमाक्रमाने अत्यंत हळूवारपणे पुढे सरकत दरवाजातून खाली उतरले. त्यामुळे बॅलेंसही टिकून राहिले.

शिडीला लटकले प्रवासी
प्रत्यक्षदर्शी आणि प्रवाशांनी छतावर जाणा-या शिडीला लटकून बस दरीत कोसळण्यापासून वाचवली. या दरम्यान इतर प्रवासी बाहेर आले. वृद्ध व लहान मुलांना उतरण्यास इतर प्रवाशांनी मदत केली.
उदयपूरच्या चीरवा येथील घाटाजवळ 300 फूट खोल दरीवर लोंबकळणारी बस.
पुढील स्लाइड्सवर पाहा अपघाताची छायाचित्रे...