आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटला होता हात, रक्ताच्या थारोळ्यात पडली होती शाळकरी मुले; अॅक्सिडेंटनंतर असे होते दृश्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - हिमाचल प्रदेशातून ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे जात असलेल्या स्कूलबसचे टायर फुटल्याने यमुना एक्स्प्रेस वेवर उलटली. अपघातात एका स्टाफ मेंबरचा मृत्यू झाला आहे, तर 16 मुले गंभीर जखमी झाली आहेत. घटनास्थळी पोहोचलेले लोक म्हणाले, बस उलटताच आरडाओरड सुरू झाली. बसच्या आतील दृश्य भयंकर होते. एकाचा हात तुटलेला होता. तर अनेक मुले रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. गंभीर जखमी विद्यार्थ्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. 
 
रक्ताच्या थारोळ्यात पडले होते विद्यार्थी..
- हिमाचल प्रदेशच्या अमर भारती शाळेतील विद्यार्थी ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे जात होते. त्यांची बस यमुना एक्सप्रेस वे मार्गे येत होती. 
- खंदौलीजवळ अचानक बसचे समोरचे टायर फुटले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. 
- अपघातामुळे एकच गोंधळ उडाला लोकांनील लगेचच मदत करायला सुरुवात केली. मुले जोरजोरात ओरडत होती, त्यामुळे अत्यंत हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली. 
- स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बस उलटताच एकच आरडा-ओरडा सुरू झाला होता. 
- लोक जेव्हा पोहोचले, तेव्हा अत्यंत विदारक स्थिती पाहायला मिळाली. मुले रक्तांच्या थारोळ्यात पडलेले होते.
- पोलिसांनी बचावकार्यात स्थानिकांची मदत केली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. 
- पोलिसांनी फायर ब्रिगेडलाही बोलावले. क्रेनच्या मदतीने बस हटवण्यात आली. 
- एत्मादपूरमध्येही काही जखमींवर उपचार सुरू आहे.
 
पुढे पाहा, अपघातानंतरचे PHOTO
बातम्या आणखी आहेत...