आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैराना: \'हे घर विक्रीसाठी नाही\', घराचे मालक म्हणाले- ग्रोथसाठी गाव सोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ (उत्तर प्रदेश) - शामली येथील हिंदू कुटुंबांच्या कथित विस्थापन आणि घरांच्या विक्रीच्या घटनेत ट्विस्ट आले आहे. गौरव जैन नामक एका व्यक्तीने दावा केला आहे, की काही लोकांनी जाणूनबुजून त्यांच्या घराच्या भिंतीवर 'घर विक्री आहे' असे लिहिले आहे. त्यांचे म्हणणे आहे, की मीडियामध्ये व्हायरल होत असलेले घर माझे असून आम्ही कोणालाही घाबरून घर सोडलेले नाही, तर आर्थिक प्रगतीसाठी सोडले आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे.

भाजप खासदारांच्या यादीत गौरव यांच्या वडिलांचे नाव
>> गौरव जैन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की शामली येथील कांधळा येथील त्यांच्या घरावर 'हे घर विक्री आहे' असे लिहिले आहे.
- भाजप खासदार हुकुमसिंह यांनी विस्थापित झालेल्या हिंदूची यादी प्रसिद्ध केल्यानंतर या घराचा फोटो उदाहरण म्हणून मीडियामध्ये आला होता.
- त्यासोबत म्हटले होते, की हे घ्या उदाहरण. हिंदू गाव सोडून जात आहेत.
- तर दुसरीकडे, गौरव जैन यांचे वडील पारसचंद यांचे नाव हुकुमसिंह यांनी प्रसिद्ध केलेल्या 63 जणांच्या यादीत होते.
- मात्र, गौरव यांनी हे सरासर खोटे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आम्ही गाव सोडून पलायन केले हे साफ खोटे आहे.

पुढील प्रगतीसाठी गाजियाबादला शिफ्ट
- गौरव म्हणाले, 'आमच्या कुटुंबाला कोणतीही धमकी आलेली नाही.'
- ते म्हणाले, 'जो दावा करण्यात आला आहे, की दबाव आणि छळ झाल्यामुळे आमच्या कुटुंबाने कांधला येथून पलायन केले, हे सरासर खोटे आहे.'
- '2010 मध्ये पुढील प्रगतीसाठी आम्ही तेथून बाहेर पडलो. त्यानंतर कुटुंब गाझियाबाद येथे स्थलांतरित झाले.'
- 'मीडियामध्ये दाखवलेले माझे घर पाहून मला आश्चर्य वाटले.'

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
- शामलीचे जिल्हाधिकारी सुजीत कुमार यांना तक्रार मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
- त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...