आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारच्या जिल्हाधिकाऱ्याने रेल्वे समोर उडी घेऊन केली आत्महत्या, दोन तुकड्यात सापडली बॉडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
7 ऑगस्टला बक्सरमध्ये जिल्हाधिकारी पदी पोस्टिंग मिळाली होती. - Divya Marathi
7 ऑगस्टला बक्सरमध्ये जिल्हाधिकारी पदी पोस्टिंग मिळाली होती.
पाटणा (बिहार) - बक्सरचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी गाजियाबाद येथे आत्महत्या केली. जिल्हाधिकारी पांडे यांचा मृतदेह गुरुवारी रात्री गाजियाबाद रेल्वे स्टेशन जवळील रेल्वेट्रॅकवर सापडला. त्यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांची एक सुसाइड नोट सापडली आहे. याशिवाय आत्महत्येआधी त्यांनी एक व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला होता. पांडे हे सारणचे रहिवासी होते. ते 2012 च्या बॅचचे आएएस अधिकारी होते. या महिन्यात 4 ऑगस्ट रोजीच त्यांना प्रथमच जिल्हाधिकारीपदी पोस्टिंग मिळाली होती. 
 
ज्या हॉटेलमध्ये जिल्हाधिकारी मुक्कामाला होते तिथेच सुनंदा पुष्करने केली होती आत्महत्या 
- अशी माहिती आहे की मुकेश पांडे दोन दिवसांची सुटी घेऊन दिल्लीला आले होते. गुरुवारी त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्याकडे पदभार सोपवला आणि वाराणसीवरुन विमानाने दिल्लीला आले होते. 
- दिल्लीत ते लीला पॅलेस हॉटेलच्या रुम नंबर 724 मध्ये मुक्कामाला होते. विशेष म्हणजे काँग्रेस नेते शशि थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू याच हॉटेलमध्ये झाला होता. 
- प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी मुकेश पांडे पश्चिम दिल्लीतील एका मॉलमध्ये गेले होते. तिथे एका मित्राची भेट घेतल्यानंतर ते मॉलमधून बाहेर पडले होते.  
- त्यानंतर रात्री 9 वाजता त्यांचा मृतदेह गाजियाबाद रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर कोटगाव रेल्वेट्रॅकजवळ सापडला. त्यांची बॉडी दोन तुकड्यात सापडली आहे. शुक्रवारी पोस्टमॉर्टम होणार आहे. 
- अशी माहिती आहे, की गुरुवारी सकाळी मुकेश यांना कळाले होते की त्यांच्या कुटुंबातील सदस्याला ह्रदयविकाराचा झटका आला आहे. 
- बक्सरमध्ये जिल्हाधिकारी पदी नियुक्तीच्या आधी मुकेश पांडे बेगुसरायमधील बलिया येथे एसडीएम आणि कटिहार येथे उपजिल्हाधिकारी होते. 
- 2012 मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुकेश यांना 14वी रँक मिळाली होती. 2015 मध्ये त्यांना संयुक्त सचिव रँकमध्ये प्रमोशन मिळाले होते. 
 
व्हॉट्सअॅप मेसेज केला 
- हॉटेलच्या 10 मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करत आहे. मी आयुष्यात निराश झालो आहे. सुसाइड नोट हॉटेल लिला पॅलेसच्या रुम नंबर 742 मध्ये माझ्या बॅगमध्ये आहे. शेवटच्या ओळीत मुकेश यांनी, मला माफ करा, माझे तुमच्या सर्वांवर प्रेम आहे. कृपया मला विसरून जा, असे लिहिले होते. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुकेश पांडे यांची सुसाइड नोट...  
बातम्या आणखी आहेत...