लखनऊ - बकरी ईदनिमित्त उत्तर प्रदेशातील ऐशबाग ईदगाह येथील इमाम आणि सुन्नी धर्मगुरू मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी मुस्लिमांना चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा फतवा जारी केला आहे. तसेच अयोध्येत पुन्हा बाबरी मशीद उभारली जावी यासाठी प्रार्थना केली.
ईदच्या नमाजनंतर मौलाना खालिद रशीद फिरंगी महली म्हणाले की, पाकिस्तानकडून वारंवार सीमेचे उल्लंघन केले जात आहे, तर दुसरीकडे चीनदेखील घुसखोरी करत आहे. त्यामुळे जवानांचे मनोबल वाढवण्याची
आपणा सर्वांची जबाबदारी आहे. याचप्रमाणे चिनी वस्तूंवरही आपण बहिष्कार टाकला पाहिजे. मुस्लिम मुलांवर चांगले संस्कार करून परिसर आणि शहर स्वच्छ करण्यात सरकारची मदत करण्याचेही आवाहन त्यांनी या वेळी केले.