आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपला सर्वात जास्त पाच जागा; पण मताधिक्यात घट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटबंदीवरील चर्चेदरम्यान सात राज्यांतील पोटनिवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या जागा कायम राखल्या. चार लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप आणि तृणमूलने प्रत्येकी २ जागा जिंकल्या. मात्र, भाजपच्या विजयी मताधिक्यात घट झाली.
भाजपने आपल्या दोन्ही लोकसभा जागा कायम राखताना विधानसभेच्या तीन जागाही जिंकल्या. पक्षाने शाहडोल लोकसभा मतदारसंघात ६० हजारपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला. भाजपने २०१४ मध्ये ही जागा २.४१ लाख मतांनी जिंकली होती. आसामच्या लखीमपूर मतदारसंघातही पक्षाचे विजयी मताधिक्य गेल्या वेळेपक्षा १.०२ लाख मतांनी घटले. यावेळी तृणमूल काँग्रेसला सर्वात मोठा विजय मिळाला. पक्षाने तामलुकची जागा ४.९७ लाखांनी तर कूचबिहारची जागा ४.१३ लाख मतांनी जिंकली.

नोटबंदीच्या मुद्द्यावर आपल्या पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा भाजप आणि तृणमूल या दोन्ही पक्षांनी केला.
तृणमूल आणि अद्रमुकनेही आपल्या तिन्ही जागा कायम राखल्या
‌अद्रमुक कार्यकर्त्यांनी विजयानंतर अपोलो रुग्णालयासमोर आनंदोत्सव साजरा केला. पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसभा निकाल
०२ भाजप
०२ तृणमूल
०३ अद्रमुक
०२ माकप

०३ भाजप
०१ काँग्रेस
०१ तृणमूल

कालिखो पुल यांची तिसरी पत्नी विजयी : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या उमेदवार दासंगलू पूल यांनी हायुलिआंग विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारावर ९४२ मतांनी विजय मिळवला. त्या माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. कालिखो पुल यांनी आत्महत्या केल्याने ही जागा रिक्त झाली होती.
विधानसभा निवडणुकीचे निकाल

तृणमूल काँग्रेसने मोतेश्वर विधानसभा मतदारसंघातही विजय मिळवला. मध्य प्रदेशमधील नेपानगर विधानसभा मतदारसंघ भाजपने कायम राखतानाच मताधिक्य २२,१७८ वरून ४२,१९८ पर्यंत वाढवले. तामिळनाडूत सत्ताधारी अद्रमुकने तंजावूर आणि थिरुप्परनकुंद्रम हे मतदारसंघ कायम राखलेच शिवाय अरवक्कुरिची मतदारसंघ द्रमुककडून हिसकावून घेतला. त्रिपुरात सत्ताधारी माकपने बरजाला मतदारसंघ काँग्रेसकडून ताब्यात घेतला तर खोवईची जागा कायम राखली. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नेल्लीथोपे मतदारसंघात विजय मिळवला.
बातम्या आणखी आहेत...