वाराणशी - वाराणशीमध्ये बकरी ईदच्या दुसर्या दिवशी (मंगळवार) उंटाची कुर्बानी देण्यात आली आहे. येथील मदनपुरा भागात ही घटना घडली. उंटाची कुर्बानी पाहाण्यासाठी हजारो लोक उपस्थित झाले होते. ईद-उल-अजहा च्या निमीत्ताने उंटाची कुर्बानी देण्यात आली. या निमीत्त होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवला होता.
मौलाना हबीब यांनी सांगितले, की मानवामधील पशूला संपवणे हा कुर्बानीचा उद्देश आहे. यानंतर लोक सत्याच्या मार्गाने चालतात. अल्लाने मानवाल त्याच्या कर्मानुसार घडवतो किंवा बिघडवतो. उंटाच्या कुर्बानीनंतर त्याचे सात भाग केले जातात. ही कुर्बानी मानवाला दुष्ट प्रवृत्तीपासून वाचवते. यामुळे 'बरकत' येते.
मौलाना हबीब यांनी कुर्बानीची कथा सांगितली. ते म्हणाले, 'एकदा हजरत इब्राहिम यांना स्वप्न पडले, की अल्लाने त्यांना त्यांचा मुलगा हजरत इस्माइलची कुर्बानी देण्यास सांगितले. स्वप्नातील आज्ञा सत्यात उतरवण्याचा त्यांचा इरादा होता. त्यासाठी ते निघाले असताना रस्त्यात त्यांना तीन दुष्ट भेटले जे त्यांच्या या कार्यात अडथळा आणत होते. शेवटी ते मुलाची कुर्बानी देऊ शकले नाही, आणि हे संकट दूर झाले. अल्लाने त्यांच्या मुलाला वाचवले. मुला ऐवजी बकर्याची कुर्बानी देण्यात आली. तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, उंटाच्या कुर्बानीची आणखी छायाचित्र
सर्व छायाचित्र - ओ.पी.मिश्रा