आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर होते लाईक्‍सची विक्री, एका \'लाईक\'ची किंमत 1 रुपये 62 पैसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेटमध्‍ये झालेल्‍या क्रांतीमुळे सोशल नेटवर्कींग हा कोट्यवधी लोकांच्‍या आयुष्‍याचा एक अविभाज्‍य घटक झाला आहे. त्‍यात फेसबूकने या लोकांच्‍या आयुष्‍यातील एक मोठा भाग व्‍यापला आहे. फेसबुकवरील 'लाईक्‍स'वरुन एखाद्या गोष्‍टीची लोकप्रियता कळते. परंतु, हे 'लाईक्‍स' कोणी विकत घेतले तर? असे 'लाईक्‍स' विकत घेता येऊ शकतात का?

राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांच्‍यावर 'लाईक्‍स' विकत घेण्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने या प्रकाराला 'सोशल साईट्स स्‍कँडल' असे नाव दिले आहे.

एका सर्वेक्षणानुसार, भारतात 160 पेक्षा जास्‍त लोकसभा मतदार संघांमध्‍ये फेसबुकचा थेट प्रभाव आहे. देशात जवळपास 10 कोटी फेसबूक युझर्स आहेत. त्‍यापैकी अर्धे लोक रोज लॉगिन करतात. त्‍यामुळे समर्थकांसोबत थेट संपर्क ठेवणे तसेच प्रचारासाठी सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, हे स्‍पष्‍टच आहे. त्‍यामुळे लाईक्‍स आणि फॉलोअर्सच्‍या संख्‍येवरुन लोकप्रियता कळते. ट्विटरवर सध्‍या गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय भारतीय नेते आहेत. त्‍यानंतर केंद्रीय मंत्री शशि थरुर यांचा क्रमांक लागतो.

कशा प्रकारे वाढतात फेसबुक लाईक्‍स आणि कशी ठरते लाईक्‍सची किंमत? जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडमध्‍ये...