आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅनडाची भारतीय मका अायातीवर बंदी, कर्करोगास कारणीभूत रसायन असल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील मका उत्पादनाच्या निर्यातीवर संकट आले आहे. कॅनडाने भारतातून होणाऱ्या मक्याच्या आयातीवर तात्पुरती बंदी घातली आहे. त्यामुळे भारतीय मक्याची निर्यात होणाऱ्या इतर देशांमध्येही बंदी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये इंडोनेशिया, बांगलादेश, व्हिएतनाम आणि नेपाळचा समावेश आहे.

कॅनडातील अन्न तपास एजन्सी सीएफआयएने आपल्या अहवालात भारतीय मक्यात एफ्लाटॉक्सिन नावाचे रसायन जास्त असल्याचा दावा केला आहे, जो कर्करोगासह इतर अनेक आजारांचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. या अहवालानंतर कॅनडा सरकारने भारतातून मक्याच्या आयातीवर बंदी घातली आहे. सीएफआयएच्या वतीने २६ मे रोजी जारी करण्यात आलेल्या नोटिसीनुसार संपूर्ण मक्याची तपासणी होईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. मक्यातील घटकांविषयी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतरच आयात सुरू करण्यात येणार आहे. एफ्लाटॉक्सिन रसायन मक्याला बुरशी लागण्यामुळे तयार होते. हे रसायन प्राणी आणि मानवाच्या शरीरात कर्करोग पसरवू शकते.

कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार या वर्षी मका उत्पादन ६.२६ टक्के कमी झाले असून ते २२७.४ लाख टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी देशात २४२.६ लाख टन मक्याचे उत्पादन झाले होते.

मोठा अायातदार देश
कॅनडा हा भारतीय मका आयात करणारा मोठा देश आहे. आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या दरम्यान कॅनडाने भारतातून ३५,४८२ टन मक्याची खरेदी केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के जास्त आहे.

निर्यातीवर परिणाम
^कॅनडाच्या बंदीचा जास्त परिणाम होणार नाही. मात्र आता एफ्लाटॉक्सिनच्या भीतीमुळे इतर प्रमुख देशांतील निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मदनलाल अग्रवाल, व्यापारी, बुलडाणा

साठा वाढेल
^निर्यात कमी झाल्यास देशातील साठा वाढेल आणि त्यामुळे किमतीवर परिणाम होईल. वास्तविक या वर्षी देशात मक्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमतीवर जास्त मोठा परिणाम होण्याची शक्यताही नाही.
मोहनलाल, मका व्यावसायिक, सांगली
बातम्या आणखी आहेत...