आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआरआय तरुणीचा बसस्‍टँडवर राडा; म्‍हणत होती, भावाने माझा रेप केला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिहोवा (जि. कुरुक्षेत्र, हरियाणा ) - कॅनडातून आलेल्‍या एका भारतीय वंशाच्‍या तरुणीने येथील बसस्‍थानकावर दोन तास राडा केला. एवढेच नाही तर माझ्या चुलत भावाने माझ्यावर बलात्‍कार केला. त्‍यामुळे अरविंद केजरिवाल यांनी मला न्‍याय द्यावा, अशी ती ओरडत होती. पोलिसांनी घटनास्‍थळावर येत तिला ताब्‍यात घेतले.
नेमके काय आहे प्रकरण....
> प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्‍या माहितीनुसार गोंधळ घालणारी युवती चंडीगड ते हिसार या बसमधून उतरली.
> खाली उतरताच तिने मोठ-मोठ्याने पंजाब सरकार आणि आपल्‍या कुटुंबीयांना शिव्‍या हासडणे सुरू केले.
> त्‍यामुळे गर्दी जमा झाली.
> माझ्या भारतीय चुलत भावाने माझ्यावर रेप केला, अशी ती ओरडून ओरडून सांगत होती.
> तिने सांगितले, तिची आई कॅनडाची आहे तर वडील लुधियाना येथील शिख कुटुंबातील आहेत.
> ती लुधियाना येथील एका इंस्टीटयूट शिकत असून, कॅनाडात ओकटोवामध्‍ये राहते.
> तिचे वडील आणि काका यांच्‍यात संपत्‍तीवरून वाद असून, वडिलांना ब्रेन ट्यूमर आहे.
> संपत्‍तीसाठी माझे काका माझ्या वडिलांना ठार करू शकतात.
> एवढेच नाही तर यात पंजाब पोलिसही सहभागी आहेत, असा अरोप तिने केला.
> मी माझ्या वडिलांना घेऊन जाण्‍याचा प्रयत्‍न केला तर काकांनी मला मारहाण केली. शिवाय चुलत भावाने माझ्यावर बलात्‍कार केला, असा आरोप तिने केला.
केजरीवाल यांची भेट घेणार
पंजाब सरकार आणि पंजाब पोलिसांवर आपला विश्‍वास नसून न्‍यायालयासाठी आपण अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहोत, असेही तिने सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, तरुणीने बसस्‍टँडवर कसा केला राडा....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)