आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅ. कालिया यांच्या हत्येची पाक जवानाकडून कबुली, प्रकरण जाणार सर्वोच्च न्यायालयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशाला - कॅप्टन सौरभ कालिया यांची पाकिस्तानी जवानांनी हत्या केल्याचा खुलासा त्या वेळच्या युद्धात सहभागी पाक जवान गुले खानदानने केला आहे. लष्कराच्या एका कार्यक्रमात त्याने दिलेल्या माहितीचा व्हिडिओ यू-ट्यूबवर प्रसिद्ध झाला आहे. या पुराव्याच्या आधारावर शहीद कॅप्टन कालिया यांचे वडील हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेणार आहेत.

सौरभ कालिया व त्यांच्या पाच सहकार्‍यांना ठार केले नसल्याचा दावा करत त्यांचे मृतदेह एका दरीत आढळल्याचे पाकिस्तानी लष्कराने याआधी म्हटले होते. खराब हवामानामुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. कारगिल युद्धादरम्यान 9 जून 1999 रोजी कॅप्टन सौरभ कालिया शहीद झाले होते.


पाकिस्तान खोटारडा : नरेंद्र कालिया
शहीद कॅप्टन सौरभ कालिया यांचे वडील नरेंद्र कालिया यांनी पाकिस्तानला खोटे बोलण्याची सवयच असल्याचे म्हटले आहे. कालिया व सहकारी जवानांना दहशतवाद्यांनी ठार केले असावे, असे कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानने म्हटले होते. मात्र, आता वस्तुस्थिती समोर आली आहे.


पुरावा म्हणून व्हिडिओ सादर होणार : सर्वोच्च् न्यायालयातील वकील अरविंद शर्मा गुले खानदानचा व्हिडिओ न्यायालयात पुरावा म्हणून सादर करणार आहेत. पाकिस्तान गेल्या 65 वर्षांपासून खोटे बोलत आला आहे, हा त्यांचा इतिहास आहे. 65 वर्षांनंतरही पाकिस्तानबाबत सरकारने कठोर धोरण स्वीकारले नाही.


कॅप्टन कालिया
व्हिडिओमध्ये काय ? : पाकिस्तानी जवान गुले खानदान स्वत:च्या व सहकार्‍यांच्या शौर्याची कथा ऐकवत असताना दिसून येतो. यादरम्यान तो म्हणतो, ते (कॅप्टन कालिया व त्यांचे सहकारी) शिकार करण्यासाठी आले होते, मात्र त्यांची स्वत:चीच शिकार झाली. मी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तैनात होतो. कॅप्टन कालिया व अन्य जवान सीमेवर रेकीसाठी आल्याचे आम्ही पाहिले. त्यांना जवळ येऊ देण्यास आमच्या कमांडरने सांगितले. आम्ही त्यांना पकडताना ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. यानंतर आम्ही त्यांच्यावर गोळीबार केला.