आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Car Accident Dharrmendra Restless All Night Hema Will Return Mumbai On Saturday

मुलगी गमावलेला पिता म्हणाला - डॉक्टरांना आमची नाही हेमाच्या चेहर्‍याची चिंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर विमानतळावरील या चार्टर्ड प्लेनने मुंबईला रवाना झाल्या हेमा मालिनी - Divya Marathi
जयपूर विमानतळावरील या चार्टर्ड प्लेनने मुंबईला रवाना झाल्या हेमा मालिनी
मुंबई/जयपूर/दौसा - आग्रा-जयपूर हायवेवर भारतीय जनता पक्षाच्या खासदार अभिनेत्री हेमा मालिनी यांची मर्सिडीज आणि अल्टो कारमध्ये झालेल्या अपघातात दीड वर्षांच्या मुलीला गमावलेले हनुमान खंडेलवाल संतप्त झाले आहेत. ते म्हणाले, जर हेमा यांच्यासोबतच माझ्या मुलीला आणि आम्हाला फोर्टिस सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले असते तर कदाचित आज माझी मुलगी जिवंत असती. जे लोक मदत करत होते, त्यांनी देखील भेदभाव केला. हेमा सेलिब्रियी आहेत म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांनाच काळजी होती. त्यांना जयपूरला नेण्यात आले. आम्हाला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेले. आपल्या रागाला आवर घालत खंडेलवाल म्हणाले, 'माझ्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांमध्येही हेमा यांच्याबद्दलच चर्चा सुरु होती. त्यांना चिंता लागून राहिली होती, की हेमा यांच्या चेहऱ्यावरील व्रण केव्हा मिटतील. जणूकाही हॉस्पिटलमध्ये तीच सर्वात मोठी समस्या होती.' दुसरीकडे हेमा मालिनी यांनी शुक्रवारी सायंकाळी पीडित कुटुंबीयांबद्दल विचारपूस केली. अपघातात दीड वर्षांची मुलगी दगावली त्याबद्दल दुःख व्यक्त केले. शनिवारी सकाळी हेमा मालिनी प्रायव्हेट चार्टर्ड प्लेनने मुंबईला रवाना झाल्या.

पीडित कुटुंबाचा आरोप आहे, की हेमा मालिनी यांनी त्यांची विचारपूस केली नाही. गुरुवारी रात्री राजस्थानच्या दौसा येथे झालेल्या अपघातात हनुमान खंडेलवाल आणि शिखा या दांपत्याची दीड वर्षांची मुलगी चिन्नीचा मृत्यू झाला होता. अपघातात हेमा यांच्यासह पाच जण जखमी झाले होते. या प्रकरणी हेमा यांचा ड्रायव्हर रमेशचंद्र ठाकूरविरुद्ध बेफिकिरीने कार चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दौसा न्यायालयाने नंतर त्याला जामीनही मंजूर केला.
शनिवारी सकाळी मिळाली सुटी
अभिनेत्री हेमा यांना शनिवारी फोर्टिस हॉस्पिटलमधून सुटी मिळाली. त्यांची मुलगी ईशा देओल त्यांनी घेण्यासाठी आली होती. खासगी चार्टर्ड प्लेनने हेमा यांना मुंबईला नेण्यात आले. आज (शनिवार) सकाळी साधाराण 11.50 मिनिटांनी त्या मुंबईतील घरी पोहोचल्या. त्यांच्यावर पुढील उपचार मुंबईत होणार असल्याचे ईशाने सांगितले. हेमा यांच्या चेहऱ्याला मार लागला असून प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे.

फोर्टिसमधून गुपचूप बाहेर
फोर्टिस हॉस्पिटलचच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक कार उभी होती. त्यामुळे माध्यमांना शक्यता होती, की हेमा आणि ईशा या मार्गानेच येतील. मात्र दोघीही हॉस्पिटलच्या दुसऱ्या गेटने गुपचूप बाहेर पडल्या. हेमा मालिनी यांना अॅम्बुलन्सने विमानतळापर्यंत नेण्यात आले. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर अॅम्बुलन्स थेट रनवेजवळ जाऊनच थांबली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, विमानतळावर ईशा देओल