आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवर उलटली माती भरलेली ट्रॉली, चालक व त्‍याची मेहूणी अडकले होते आत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- शहरातील सर्वात मोठ्या विमानतळाच्‍या समोरील जवाहर सर्कलवर एक विचित्र अपघात झाला आहे. मातीने भरलेल्‍या ट्रॅक्‍टरची ट्रॉली कारवर पलटल्‍याने हा अपघात झाला. या घटनेत कारमध्‍येही माती भरल्‍या गेली आहे. आत बसलेल्‍या प्रवाशांना मोठ्या मेहनतीने
बाहेर काढण्‍यात आले. या दुर्घटनेत कार चालक अक्षय आणि त्‍याची मेहुणी किरकोळ जखमी झाले आहेत.
अशी घडली घटना...
- दुबईमध्‍ये बिझनेस करणारे अक्षय जयपूरमध्‍ये त्‍यांच्‍या मेहुणीला घेऊन विमानतळावर जात होते.
- जयपूर एयरपोर्टवर ते पत्‍नीला घेण्‍यासाठी जात होते.
- एयरपोर्टवर पोहोचण्‍याआधीच त्‍यांच्‍या कारला अपघात झाला;
- माती भरलेली ट्रॉली घेऊन एक ट्रॅक्‍टर चुकीच्‍या दिशेने येत होता.
- दरम्‍यान समोरून येणारी कार पाहुन ट्रॅक्‍टर चालकाने ब्रेक लावला.
- मातीने भरलेली ट्रॉली कारवर पलटली.
- ट्रॉलीतील पूर्ण मातीखाली ही कार झाकल्‍या गेली.
- आत बसलेल्‍या दोघांनी मदतीसाठी हाकाही मारल्‍या.
- परिसरातील लोकांनी कारवरील माती हटवून दोघांना बाहेर काढले.
- मात्र ट्रॅक्टरच्‍या चालकाने पळ काढला आहे.
- बाहेर निघाल्‍यानंतर दोघांनी परिसरातील लोकांचे आभार मानले.
- मातीत जिवंत गाळल्‍यासारखे आम्‍हाला वाटत होते, असे त्‍यांनी सांगितले.
- कारमधून बाहेर आलेल्‍या दोघांच्‍याही कपड्यांमध्‍ये माती भरली होती.
फोटो : राजकुमार शर्मा
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घटनास्‍थळावरील फोटो....
बातम्या आणखी आहेत...