आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्टोसॅट-2 सोबत 31 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; दहशतवाद्यांची ठिकाणे शोधण्यास होणार मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्टोसॅट-2 सीरिजचे उपग्रह हे संरक्षण क्षेत्रासाठी आहेत. (सांकेतिक फोटो) - Divya Marathi
कार्टोसॅट-2 सीरिजचे उपग्रह हे संरक्षण क्षेत्रासाठी आहेत. (सांकेतिक फोटो)
हैदराबाद- कार्टोसॅट-2 मालिकेतील तिसऱ्या सॅटेलाइटचे आज श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या लेटेस्ट रिमोट सेंसिग उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे दहशतवाद्याची ठिकाणे शोधण्यास मदत होणार आहे. या उपग्रहामुळे छोट्या बाबींची छायाचित्रे देखील प्राप्त करता येणार आहेत. याच सीरीजमधील आधी लॉन्च करण्यात आलेल्या दोन सॅटेलाइटचे रेझ्यूलेशन 0.8 मीटर होते. या तिसऱ्या सॅटेलाइटचे रेझ्यूलेशन 0.6 मीटरचे आहे. यामुळे हॅ सॅटेलाइटमुळे लहानातील लहान बाबीचे छायाचित्र टिपता येणार आहे.  कार्टोसॅट-2 सोबतच 31 नॅनो सॅटेलाइटदेखील लॉन्च करण्यात आले आहेत. 
 

काय होणार फायदा
- एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहात असलेल्या तांत्रिक क्षमतांमुळे संरक्षणविषयक माहिती अधिक अचूक मिळेल. याचा वापर दहशतवाद ठिकाणे, बंकर्स शोधण्यास आणि लष्करी माहितीची पडताळणी करण्यात होऊ शकेल. 
- हे उपग्रह ऑपरेशनल झाल्यानंतर ते लष्कराला हस्तांतरित करण्यात येणार आहेत. लष्कराकडे यासंदर्भातील आवश्यक मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान आहे. 
 
14 देशांचे उपग्रह केले प्रक्षेपित
- इस्त्रोने आज सोडलेल्या 31 उपग्रहांपैकी 29 उपग्रह हे 29 देशांचे आहेत. यात ऑस्ट्रिलिया, बेल्जियम, ब्रिटन, चिली, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, स्लोवाकिया, अमेरिका, लातीविया, लिथुआनिया या देशांचा समावेश आहे. 
 
एक उपग्रह नूरल इस्लाम विद्यापीठाचा
- सोडण्यात आलेल्या 30 नॅनो उपग्रहांमधला एक उपग्रह हा तामिळनाडूतील नूरल इस्लाम विद्यापीठाचा आहे. तो शेती आणि आपत्तीविषयक निरीक्षण करणार आहे. 
 
पहिल्या उपग्रहांचा झाला असा उपयोग
- यापूर्वी सोडण्यात आलेल्या उपग्रहांनी दहशतवाद्यांच्या हालचाली टिपल्या होता. शेजारी देशातील छायाचित्रे मिळाल्याने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास मदत होत आहे.
 
नव्या उपग्रहाचे वैशिष्टय
हाय रिझिल्यूशेन इमेज हे नव्या उपग्रहाचे वैशिष्टय आहे. हव्या त्या ठिकाणी छायाचित्रे हा उपग्रह पाठविणार आहे. ​
 
PSLV-C38 चे 40 वे़ उड्डाण
- कार्टोसॅट-2 चे वजन 712 किलोग्रॅम आहे. याच्यासोबत अलेले अन्य 20 उपग्रह हे 243 किलो वजनाचे आहेत.
- PSLV-C38 लॉन्च व्हेकलचे हे 40 वे उड्डाण होते.
 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...