आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणा: गुत्थी, पलक, दादीवर धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून सुनील ग्रोवर (गुत्थी), कीकू शारदा (पलक), असगर अली (दादी). - Divya Marathi
डावीकडून सुनील ग्रोवर (गुत्थी), कीकू शारदा (पलक), असगर अली (दादी).
कैथल (हरियाणा) - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत रामरहीम यांची खिल्ली उडवणाऱ्या एका कॉमेडी शोच्या कलाकारांसह नऊ जणांवर धार्मिक भावना भडकवण्याच्या आरोपात गुन्हा दाखल झाला आहे. 27 डिसेंबर रोजी हा शो प्रसारित झाला होता.

काय आहे आरोप
- डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांचा आरोप आहे की जश्न-ए-आझादीच्या कॉमेडी शोमध्ये 'एमएसजी-टू' च्या एका सीनचे विद्रूपीकरण करण्यात आले.
- त्यात गुरमीत रामरहीम यांच्या गेटअपमध्ये कलाकार दारूचा प्याला भरतात आणि तरुणींसोबत अश्लील डान्स करतात.

कोणावर गुन्हा दाखल
- कीकू शारदा (पलक), सुनील ग्रोवर (गुत्थी), असगर अली (दादी), राजीव ठाकूर, पुजा बॅनर्जी, मुन्ना राय, गौतम गुलाटी आणि सना खानसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- 'कॉमेडी नाइट विथ कपील'मध्ये कीकू शारदा (पलक), सुनील ग्रोवर (गुत्थी), असगर अली (दादी) च्या भूमिकेत असतो.

कोण आहे तक्रारदार
- डेरा समर्थक उदयसिंह यांनी शुक्रवारी रात्री या कलाकारांविरुद्ध कैथल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

पोलिसांकडून तपास सुरु
- या प्रकरणी पीआय ईश्वर यांनी सांगितले, की चॅनलसह नऊ जणांवर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, डेरा समर्थकांचा रास्तारोको
बातम्या आणखी आहेत...