आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यात शाहरूख खान विरोधात गुन्हा दाखल, रेल्वेच्या मालमत्तेच्या नुकसानीचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा (राजस्थान) - कोटा रेल्वे स्टेशनवर रईस चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शाहरुख खानच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे कोर्टाच्या आदेशानंतर मंगळवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण.. 
- काही दिवसांपूर्वी शाहरूख खानने त्याच्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून नवी दिल्लीपर्यंत रेल्वेप्रवास केला होता. 
- यादरम्यान रेल्वे अनेक स्टेशनवर थांबली. त्याठिकाणी शाहरूख चाहत्यांना भेटला होता.
- या स्टेशनपैकी कोटा हेदेखिल एक स्टेशन होते. 
- इतर सर्व स्टेशनप्रमाणे याठिकाणीही मोठ्याप्रमाणावर गर्दी होती. शाहरूखला भेटण्यासाठी प्रवासी कोचबाहेर धक्काबुक्कीदेखिल करत होते. 

का दाखल झाला गुन्हा.. 
- शाहरुख कोटा स्टेशनवर जवळपास 10 मिनिट थांबला होता. या दरम्यान तो फॅन्सकडे फुगे, बॉल्स आणिइतर वस्तू फेकत होता. त्यामुळे गर्दी आणखी वाढायला लागली होती. 
- लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जदेखिल करावा लागला होता. 
- यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये रेल्वे स्टेशनवरील फूड स्टॉलचेही नुकसान झाले होते. 
- या प्रकरणी रेल्वे कोर्टात तक्रार करण्यात आली. त्यानंतर कोर्टाने खटला दाखल करण्याचे ऑर्डर दिले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...