आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटलींविरुद्ध देशद्रोहाचा खटला, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला संबोधले होते निरर्थक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (एनजेएसी) कायदा रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘निरर्थक’ संबोधले होते. याबद्दल कुलपहाड येथील सिव्हिल जज अंकित गोयल यांच्या आदेशावरून जेटलींविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल झाला आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्सही जारी झाले. सुप्रीम कोर्टाने लोकशाहीच्या मूळ भावनांकडेच दुर्लक्ष केले आहे, असे वक्तव्य जेटली यांनी रविवारी केले होते. मात्र, गोयल म्हणाले, घटनेत न्यायसंस्था, संसद आणि विधिमंडळाच्या कार्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. मतभेदाच्या स्थितीत घटनासंमत प्रक्रियाच अमलात आणली पाहिजे. सुप्रीम कोर्ट ही घटनेद्वारे स्थापन झालेले सरकारच आहे. त्याच्याविरोधात अशी वक्तव्ये हा देशद्रोह आहे.