(फोटो- मंत्री विमा भारती यांचा लॅब्राडोर श्वान कृष्णा)
पूर्णिया- बिहारच्या आदिवासी कल्याण मंत्री विमा भारती यांच्या लॅब्राडोर श्वान 'कृष्णा' याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भवानीपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. कृष्णा नामक श्वानावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. श्वानावर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करावा, असा प्रश्न उपपोलिस निरीक्षक एस.एन.पांडे यांच्यासमोर उभा राहिला आहे.
गेल्या बुधवारी मंत्री बीमा भारती यांचे पती अवधेश मंडल यांनी सरकारी कर्मचार्यांना श्वान अंगावर सोडेल, अशी धमकी दिली होती. एवढेच नाहीतर मंडल यांच्या इशार्यावर श्वानाने सरकारी कर्मचार्यांच्या टेबलवरील कागदपत्रे अस्ताव्यस्त पसरवले होते.
महसूल कार्यालय बंद...
अवधेश मंडल यांच्यावर शासकीय कर्मचार्यांना मारहाण तसेच त्यांच्या अंगावर श्वान सोडण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी भवानीपूर महसूल कार्यालयाबाहेर मंडल यांच्या हजारो समर्थकांनी ठिय्या मांडला. मुख्य कार्यकारी अधिकार्याविरोधात 'भ्रष्ट सीओ वापस जा, गुन्हा परत', अशी घोषणाबाजी केली. मंडल समर्थक सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयाबाहेर उपस्थित होते. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर महसूल कार्यालय बंद ठेवण्यात आले. एकही कर्मचारी कार्यालयात आलेला नव्हता. सीओ अनिलकुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता त्यामुळे अधिकारी कार्यालयात आले नसल्याचे गटविकास अधिकार्यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाल्या विमा भारती...