आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cash For Vote Case Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu In Alleged Cm

कॅश फॉर व्होट: आंध्र प्रदेशामध्ये तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध खटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - तेलंगणाविधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या कॅश फॉर व्होट घोटाळ्याला नवीन वळण आले आहे. आंध्र पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे दूरध्वनी अवैध पद्धतीने टॅप केल्याचा केसीआर यांच्यावर आरोप आहे.

तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) ३१ मे रोजी तेलुगू देसमचे आमदार रेवंत रेड्डी यांना अटक केली होती. विधान परिषद निवडणुकीत आमदार एल्विस स्टीफेंसन यांना ५० लाख रुपयांची लाच देताना त्यांना पकडण्यात आले होते. यानंतर दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत. स्थानिक मीडियामध्ये नायडू आणि प्रस्तुत आमदारामधील चर्चेचे ऑडिओ रेकॉर्डिंग प्रसारित झाले आहे. यामध्ये नायडू स्टीफेंसन यांना म्हणतात, त्यांनी तेलुगू देसमच्या उमेदवाराला मत दिल्यास त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल.

एसीबी या प्रकरणात रेड्डी आणि अन्य दोन आरोपींची चौकशी करत आहे. विशाखापट्टणमच्या शहर तीन पोलिस ठाण्यात अॅड. एनव्हीव्ही प्रसाद यांच्या तक्रारीवर राव यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये आरोप ठेवण्यात आले आहेत.

राहुल यांची तेलंगणासारखीच तामिळनाडूत पदयात्रा
चेन्नईकाँग्रेसउपाध्यक्ष राहुल गांधी या महिन्याच्या अखेरीस तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार असून तेथे ते १५ किलो मीटरची पदयात्रा करणार आहेत. पदयात्रेची तारीख मात्र स्पष्ट झालेली नाही. अलीकडेच त्यांनी तेलंगणामध्ये मोठी मोहीम घेतली होती. राहुल यांच्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास तामिळनाडूतील काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतो. भूसंपादन विधेयकासह अनेक मुद्यांवर ते मोदींना लक्ष्य करतील.

नायडू यांनी राजीनामा द्यावा:काँग्रेस
कॅशफॉर व्होट प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी केली. या मुद्द्यावर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवालदेखील काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा आेझा यांनी केला. न्यायालयीन चौकशी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली व्हायला हवी. आेझा सोमवारी पत्रकारांशी बोलत होत्या. परंतु नायडू या मुद्द्यावर पक्षपातीपणा दाखवून दिला आहे. म्हणूनच त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा.

टीडीपीकडून राज्यपालांच्या हस्तक्षेपाची मागणी
तेलुगू देसम नेत्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर द्वेषभावना पसरवल्याचा आरोप लावत राज्यपाल ईएसएल नरसिंम्हन यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते पी. केशव म्हणाले, राज्यपालांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून केसीआर यांचे कटकारस्थान रोखले पाहिजे. आंध्र सरकारच्या माहिती विभागाचे सल्लागार पी. प्रभाकर म्हणाले, तेलंगणा सरकार सूड भावनेतून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे.