आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिटर्नमध्ये 2 लाखांवर रोख कर्ज, कार्ड पेमेंटची माहिती आवश्यक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसांत तुम्ही जर २ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम देऊन कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डाचे बिल भरले असेल तर ती माहिती इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये भरावी लागेल. नव्या रिटर्नमध्ये याची तरतूद करण्यात आली आहे.
 
प्राप्तिकर विभागाने नुकतेच २०१७-१८ वर्षासाठी (वित्तवर्ष २०१६-१७) आयटीआर जारी केले आहेत. नव्या फाॅर्ममध्ये एक कॉलम जोडण्यात आला आहे. नोटाबंदीनंतर ९ नोव्हेंबरपासून ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान खात्यातून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल त्याची माहिती या कॉलममध्ये भरावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...