आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅटचा निकाल अपलोड करणारी वेबसाइट नकली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोझीकोडे, कोलकाता, लखनऊ - वेबवीव्हर्स. आयआयएमच्या कॅट प्रवेश परीक्षेचा निकाल अपलोड करणार्‍या या कंपनीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. पैशांच्या मोबदल्यात 4 पर्सेंटाइल गुण असलेल्या विद्यार्थ्याचा निकाल 99 पर्सेंटाइल असल्याचे दाखवले. अशा 80 विद्यार्थ्यांना देशातील बड्या व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये अगदी सहजपणे प्रवेश मिळाला.

‘दिव्य मराठी’ने तपास केला असता, वेब वीव्हर्स या कंपनीचा पत्ताच खोटा असल्याचे उघडकीस आले. कागदपत्रांवरील पत्ता असा आहे - 304, नेताजी सुभाषचंद्र बोस कॉम्प्लेक्स, लखनौ वैद्यकीय महाविद्यालयाजवळ. परंतु प्रू्ण कॉम्प्लेक्समध्ये हा नंबरच नाही. आयआयएमची प्रवेश परीक्षा असलेल्या कॅट 2012 च्या घोटाळ्यामुळे संबंधित संस्थाही बुचकळ्यात पडल्या आहेत. कॅटच्या निकालावर विद्यार्थ्यांना प्रवेश देणार्‍या व्यवस्थापन संस्थाही नाराज आहेत. पैसे खाऊन 99 पर्सेंटाइल गुण दिलेला विद्यार्थी आयआयएममध्ये प्रवेशासाठी आलाच नाही, त्यामुळे हा घोटाळा उघड झालाच नाही. आयआयएमकडे गुणपत्रिकेची सत्यप्रत असते. त्यामुळे विद्यार्थी तेथे गेला असता तर पकडला गेला असता.

संस्थांमध्ये प्रवेश घेतला तर कॅटच्या गुणांनुसार प्रवेश मिळतो. काही विद्यार्थ्यांनी गुडगावमधील व्यवस्थापन विकास संस्थेत (एमडीआय) तर काहींनी बिर्ला व्यवस्थापन संस्थेत म्हणजेच बिमटेक येथे प्रवेश घेतला. काही विद्यार्थ्यांनी इतरत्र प्रवेश मिळवला.

आयआयएमच्या अशा बेदखलीमुळे खासगी व्यवस्थापन संस्था प्रचंड संतापलेल्या आहेत. बिमटेकचे व्यवस्थापक डॉ. हरिवंश चतुर्वेदी सांगतात की, खासगी संस्थांची ही क्रूर चेष्टा आहे. माध्यमांकडून आम्हाला खरी माहिती मिळाली. आयआयएमला यापासून कोणतेही नुकसान पोहोचत नसेल. आमची मात्र घोर फसवणूक झाली आहे.

कॅटचे आयोजन करणार्‍या कोझीकोडे आयआयएम किंवा घोटाळेबाज विद्यार्थ्यांना प्रवेश देणार्‍या खासगी संस्थांनी हा प्रकार उघडकीस आणलेला नाही, तर कॅटचे प्रभारी प्राध्यापक एसएसएस कुमार यांना मिळालेल्या एका ई-मेलमुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. या मेलमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिले होते, त्याचा परीक्षा क्रमांकही दिलेला होता. घोटाळ्याचा पर्दाफाश होताच वीव्हर्सचे सर्व अधिकारी गायब झाले. वेबसाइटवरील अधिकार्‍यांचे फोन नंबर चुकीचे आहेत किंवा बंद आहेत.


वेबवीव्हर्सचे सत्य
‘दिव्य मराठी’ने केलेल्या तपासानुसार, वेबवीव्हर्सच्या मालकाचे नाव शुजाऊल हसन असे आहे. तो पंधरा वर्षांपासून लखनऊमधील अमिनाबाद इंटर कॉलेजमध्ये संगणक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचा भाऊ आफाक हसन हा कोझीकोडेमधून आयआयएमच्या अधिकाºयांच्या संपर्कात होता. तीन वर्षे काम केल्यानंतर खासगी व्यवस्थापन संस्थांना मूळ गुणपत्रिका पाठवल्या जात नसल्याचे त्यांना कळले. एमबीएमध्ये प्रवेश देण्याची जाहिरात देऊन श्रीमंत विद्यार्थी हेरले. गुणपत्रिका अपलोड करताना त्यांचे पर्सेंटाइल वाढवले. आयआयएममध्ये प्रवेश न घेता देशातील चांगल्या दर्जाच्या खासगी संस्थांमध्ये प्रवेश घ्या, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

अनुत्तरित प्रश्न
> अपरिचित कंपनीवर एवढ्या महत्वाच्या परीक्षेचा निकाल अपलोड करण्याची जबाबदारी का सोपवण्यात आली? आयआयएम हे काम स्वत: का करत नाही?
> आयआयएम- लखनऊने कंपनीची कोणतीही चौकशी का केली नाही? कंपनीने जो पत्ता सांगितला तेथे तिचे आॅफिस आहे की नाही याचीही खातरजमा का केली नाही?
> आयआयएम- लखनऊ आणि कोलकाता या घोटाळ्याच्या चौकशीपासून दूर का पळत आहेत?
> कॅटचे मास्टर स्कोअर कार्ड खासगी संस्थांना का पाठवले जात नाही?
> आयआयएमचा एखादा कर्मचारी या घोटाळ्यात सहभागी तर नाही ना?
> विद्यार्थी 99 पर्सेंटाइल निकाल घेऊन खासगी संस्थेत गेले तेव्हा आयआयएममध्ये का गेले नाही, अशी विचारणा का केली नाही?