आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरआरआय पॅनलला आग, केबल चोरीतही रेल्वे सुरळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - रेल्वे स्थानकांच्या आसपास केबल कापणे, केबल चोरी होणे, रुट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय)पॅनलमध्ये आग लागणे व अन्य बाबींमुळे सिस्टिम ठप्प झाल्यास त्याचा रेल्वे वाहतुकीवर आता कोणताही परिणाम होणार नाही. रेल्वेने ऑप्टिकल फायबर सिस्टिम (ओएफसी) बेस्ड बॅकअप सिग्नलिंग प्रणाली तयार केली आहे. ही प्रणाली पर्यायी स्वरुपात काम करू लागेल. लॅपटॉप डेस्कटॉपवरून त्याचे नियंत्रण करता येईल. कोणत्याही स्थानकाच्या आरआरआयच्या समांतर ओएफसीच्या जंक्शन बॉक्सशी कनेक्ट करून त्याला सिग्नल देता येऊ शकेल.

ही प्रणाली आरआरआयला पर्याय असेल. यात लावलेल्या सुरक्षात्मक यंत्रणेची चाचणी झाली. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार नाही. रेल्वे सेवा काही तासांत पूर्ववत होईल. आरडीएसओचे महासंचालक पी. के. श्रीवास्तव यांनी सिग्नल व टेलिकॉम संचालकाच्या अधिकाऱ्यांना ओएफसी बेस्ड बॅकअप सिग्नलिंग सिस्टिम विकसित करण्याचे निर्देश दिले होते. आरडीएसआेने वर्षभरात आरआरआयची समांतर बॅकअप प्रणाली विकसित केली आहे.

लागू करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा
रेल्वे सुरक्षा आयुक्त पी. के. मिश्रा यांची मंजुरी मिळताच हे तंत्रज्ञान देशभरात उपलब्ध होईल. आतापर्यंत आरडीएसओने ओएफसी बेस्ड बॅकअप सिग्नलिंग सिस्टिमची चाचणी घेतली आहे. हे तंत्रज्ञान निशातपुरामध्ये (भोपाळ) स्थापन केले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीसाठी याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. चाचणीच्या निष्कर्षावरून ते आपल्या स्तरावर निर्णय घेतील.

सध्या सिग्नल नियंत्रण करण्याचे काम स्टेशन मास्तर करतात
सध्या एखादी रेल्वे फलाट क्रमांक एकवर यायची असेल तर स्टेशन मास्तरसमोरील फलाटाशी संबंधित क्रमांक एक बटण असते. ते पुश करताच त्याचा सिग्नल चालू होतो आणि अन्य लूप लाइन यापासून दूर होतात. रेल्वे एक क्रमांकाच्या प्लॅटफार्मवर येऊन थांबते. ओएफसी बेस्ड बॅकअप सिग्नलिंग सिस्टिम लागू झाल्यानंतर लॅपटॉप व डेस्कटॉपद्वारे सिग्नल नियंत्रित होऊ शकतील.

यामुळे तंत्रज्ञान विकसित
इटारसीमध्ये रुट रिले इंटरलॉकिंग पॅनलमध्ये २०१५ मध्ये आग लागली होती. यामुळे रेल्वेला २,४०४ रेल्वे रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. १००० कर्मचाऱ्यांनी ३४ दिवसांमध्ये रेल्वे वाहतूक पूर्ववत केली. यानंतर हे तंत्रज्ञान विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. अजय मायकेल, जनसंपर्क अधिकारी, उत्तर रेल्वे दिल्ली विभाग
बातम्या आणखी आहेत...