आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Caught A Live Terrorist Qasim Khan Is From Faisalabad Pakistan

J&K ATTACK: पळून जाण्यासाठी मार्ग विचारत होता दहशतवादी उस्‍मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - उधमपूर येथे बीएसएफ जवानांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील कसाबनंतर प्रथमच एखादा दहशतवादी जिवंत ताब्यात आला आहे. उधमपूर येथे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव उस्‍मान असल्याचे सांगण्यात येत असून तो पाकिस्तानातील फैसलाबाद येथील रहिवाशी आहे. तो सहा दिवसांपूर्वी पुंछ मार्गे भारतात आला होता. उस्‍मानने त्याचे वय 22 वर्षे सांगितले आहे. गावकऱ्यांनी धाडस दाखवून त्याला पकडले. त्याने पळून जाण्यासाठी गावकऱ्यांना रस्ता विचारला होता. जंगलाच्या मार्गाने भारतात आल्याचे त्याने सांगितले आहे.
विक्रम आणि राकेशने दाखवले धाडस
उस्‍मानला स्थानिक तरुण विक्रमजीत आणि राकेश या दोघांनी पकडले. उस्‍मानने विक्रमजीतला ताब्यात घेतले होते आणि बंदूकीचा धाक दाखवून फरार होण्यासाठी कोणता मार्ग चांगला आहे याची विचारणा करत होता. राकेश त्याच मार्गाने निघाला होता. विक्रमजीतने सांगितले तो हिंदी बोलत होता. विक्रमजीत म्हणाला, 'त्याने (दहशतवाद्याने) आम्हाला पळून जाण्यासाठी कोणता मार्ग आहे तो सांगा, मी कोणाला काही करणार नाही.'असे विचारले. आम्ही तेव्हाच त्याला पकडण्याचा विचार केला. त्याने मला मारण्याची धमकी दिली. म्हणाला, मला फरार व्हायचे आहे. त्यासाठी कोणता मार्ग सोईचा आहे. मी तुम्हाला काही करणार नाही. आम्ही पुढे चालत होतो. त्याने मला आणि माझ्या भावाला पकडून ठेवले होते. त्याला भूक लागली होती. आम्ही त्याला खाण्यासाठी दिले. रस्त्यात राकेश भेटला. जेव्हा पोलिसांच्या गाड्या दिसायला लागल्या तेव्हा तो आम्हाला धमकावू लागला. राकेशने त्याच्या मानगुटीला पकडले आणि मी त्याची गण घेतली. त्याने फायर देखली केले. माझ्या हाताला लागले.' विक्रमजीत म्हणाला, आम्ही जेव्हा त्याला पकडले तेव्हा तो त्याच्या सहकाऱ्यांबद्दल आमच्याकडे विचारणा करत होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दहशतवाद्यांना पकडणाऱ्या विक्रम आणि राकेशचे फोटो