आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावेरी वाद : व्यवस्थापन मंडळ स्थापन करा, तामिळनाडूचे केंद्राला साकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - सर्वोच्च न्यायालयाकडून कर्नाटक सरकारला मंगळवारी ७ ते १८ ऑक्टोबरपर्यंत कावेरीचे किती पाणी तामिळनाडूसाठी सोडणार आहात, अशी विचारणार कर्नाटकला केली आहे. प्रत्येक दिवशी २००० क्यूसेक पाणी तामिळनाडूला दिलेच पाहिजे,असे निर्देश न्यायालयाने कर्नाटकला दिले आहेत. दरम्यान तामिळनाडूने केंद्राकडे न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कावेरी जलविवाद सोडविण्यासाठी कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापण्याची विनंती केली आहे.

पुनर्विलोकन याचिका केंद्राने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेली आहे. शिखर वा वरील कोर्टातील यासंबंधीची याचिका केंद्राने निकाली काढावी असे तमिळनाडूने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर अॅटर्नी जनरल मुकुंद रोहतगी यांचे कावेरी व्यवस्थापन मंडळ (सीएमबी) लवकरात लवकर स्थापावे हे म्हणणे ३० सप्टेंबर रोजीच नोंदविले आहे. मुख्य सचिव पी.रामा मोहन राव हे जलऊर्जा सचिव शशी शंकर यांच्याशी पत्रातून हा मुद्दा मांडला आहे. त्यात राव म्हणाले , एजी यांनी कर्नाटक, तामिळनाडू, केरळा आणि पुद्दुचेरी यांनी त्यांचे कावेरी जल विवाद लवादावर आपले प्रतिनिधी निश्चित करावेत. वास्तविक रोहतगी यांच्या अहवालावर न्यायालयाने तीन राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांना निर्देशित दिले होते. त्यात १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतच हे प्रतिनिधी नेमणे अपेक्षित होते. त्यांनतर एजींनी आपला अहवाल व मत नंतर दाखल केले. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तामिळनाडूने आर. सुब्रमण्यन जे कावेरी टेक्निकल सेलचे अध्यक्ष यांची नियुक्ती कावेरी जलव्यवस्थापन मंडळावर केली आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पाणी वाटपाचा हा वाद न्यायालयाबरोरच विधानसभेतही झाला.

कावेरी पाणीप्रश्नी निषेध मोर्चा
तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष एआयएडीमके यांनी केंद्राला चांगलेच डिवचले. केंद्र जाणूनबुजून याप्रकरणी राजकारण करू पाहतेय. तसे नसते तर तामिळनाडूला याचिका मागे घेण्यास सांगितले नसते. लोकसभेचे उपसभापती एम. थंबीदुराई यांनी याप्रकरणी पार्लमेंट हाऊस ते पंतप्रधानांचे निवासस्थान यादरम्यान निषेध मोर्चा काढला होता. शिवाय त्यांच्या ४९ सदस्यीय सहकाऱ्यांच्या पथकास पंतप्रधान मोदींनी भेट देण्यास नाकारले.
बातम्या आणखी आहेत...