आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cave Of Maharana Pratap Who Fought With Akbar In Haldi Ghati

अकबराला धुळ चारणार्‍या महाराणांनी या गुहेत खाल्ल्या होत्या गवताच्या भाकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकबरला धुळ चारणारे वीर योद्धे महाराणा प्रताप हे एका गुहेमध्ये गवताची भाकरी खाऊन काही दिवस राहिले होते. हे असे ठिकाण आहे, ज्याला महाराणा प्रतापांनी आपले शस्त्रागार बनविले होते. चला तर जाणून घेऊ या गुहेची कहानी.
मेवाडच्या इतिहासात मायरा गुहेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाने या गुहेत प्रवेश करण्यासाठी तीन मार्ग आहेत, ते कोणत्याही भुल-भुलैयापेक्षा कमी नाहीत. या गुहेचे वैशिष्ट्य असे आहे, की बाहेरून पाहाताना ही एखाद्या डोंगरा प्रमाणे भासेल. मात्र, आत गेल्यानंतर यात एक रस्ता लागतो. यामुळेच ही गुहा सुरक्षीत समजली जाते आणि त्यामुळेच महाराणा प्रतापांनी येथे शस्त्रागार केले होते.
महाराणा प्रताप यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा दिल्लीत सम्राट अकबराचे राज्य होते. त्याला देशातील सर्व राजे-महाराजे आपल्या अधिपत्याखाली आणायचे होते. मेवाडची भूमी मोगलांच्या आधिपत्यापासून वाचवण्यासाठी महाराणा प्रताप यांनी प्रतिज्ञा केली होती, की जोपर्यंत मेवाड स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत मी राज महालाचा त्याग करुन जंगलातच राहाणार. दुसरीकडे अकबराने जर महाराणा शरण येणार असतील तर त्यांना हिंदूस्थानचे वारस नेमून आपण फक्त बादशाह राहाण्यास तयार असल्याचे प्रस्ताव दिला होता. त्याला उत्तर देताना प्रताप यांनी म्हटले होते, स्वादिष्ट भोजनाचा त्याग करुन मी कंदमुळे खाऊन राहील पण अकबराचे आधिपत्य स्विकारणार नाही.
हल्दी घाटीच्या युद्धात अकबराविरोधात लढत असताना महाराणा प्रताप यांनी या गुफेत आपला शस्त्रसाठा ठेवला होता. हे युद्ध फार ऐतिहासीक मानले जाते. कारण या युद्धात अकबराकडे 85 हजार आणि प्रताप यांच्याकडे फक्त 20 हजारांचे सैन्य होते. असे असतानाही महाराणा प्रतापांनी अकबराला धुळ चारली होती. प्रताप यांचा पराक्रम एवढा मोठा होता, की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची बहादूरी आठवून अकबरालाही रडू कोसळले होते.
हल्दी घाटीच्या युद्धाची आठवण करुन देणारी ही गुहा एवढी मोठी आहे, की येथे घोड्यांसाठी अश्वशाळा आणि भव्य स्वंयपाकघर देखील होते. महाराणा प्रतापांचा लाडका चेतक देखील येथे राहात होता. त्यामुळे आजही ती जागा पुजनीय आहे. याच्या जवळच हिंगलाज मातेचे मंदिर आहे. निसर्गाचे अदभूत सौंदर्य आणि इतिहासाची साक्ष असलेली ही गुहा आजही सर्वसामान्यांच्या नजरेआड आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गुफेच्या आतील दृष्य