आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Arrests BJD MP Ramchandra Hansda And 2 Ex MLAs

ओडिशा चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी बीजेडीचे खासदार रामचंद्रासह दोन माजी आमदार अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर- कोट्यवधी रुपयांच्या चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी बीजेडीला आणखी एक झटका बसला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे पथकाने (सीबीआय) मंगळवारी बीजू जनता दलाचे (बीजेडी) खासदार रामचंद्रा हंसदा यांच्यासह माजी आमदार सुबरना नाऐक आणि हितेश बागारती यांना अटक केली.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बीजेडीच्या नेत्यांना स्पेशल इनव्हेस्टीगेशन टीमना गुन्ह्याचे षडयंत्र रचणे, फसवणूक करणे या आरोपाखाली अटक केली आहे. अटकेतील तिन्ही नेते नाबाडीगंता कॅपिटल सर्व्हिस लिमिटेडचे माजी संचालकही असल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. याशिवाय सीबीआयने राज्यातील 44 फ्रॉड कंपन्यांची चौकशी सुरु केली आहे. या कंपन्यांनी शेकडो लोकांना गंडा घातला आहे.

खासदार हंसदा आणि माजी आमदारांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.

दरम्यान, जुलै महिन्यात खासदार हंसदा यांच्या घरात 28 लाख रूपयांची बेहिशेबी रोकड सापडली होती. पक्ष न‍िधी असल्याचे सांगत खासदार हंसदा यांनी स्वत:चा बचाव केला होता.