आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex CM भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या 20 ठिकाण्यांवर CBI चे छापे, 7 शहरांमध्ये कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुड्डा यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. इन्सेट - माजी मुख्यमंत्री हु्ड्डा. - Divya Marathi
हुड्डा यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. इन्सेट - माजी मुख्यमंत्री हु्ड्डा.
रोहतक - हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या 20 पेक्षा जास्त ठिकाण्यांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले आहेत. गुडगाव, पंचकूला, चंदीगड, दिल्ली, रोहतक येथे हे छापे टाकण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मानेसर भूखंड घोटाळा प्रकरणात ही कारवाई होत आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 4 वाजता छापेमारीला सुरुवात झाली.
- हुड्डा यांच्या चंदीगडमधील निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी कागदपत्र तपासत आहेत.
- रोहतक येथे हुड्डा यांच्या निवासस्थानासोबत त्यांचे मुख्य सचिव एमएल तायल आणि माजी ओएसडी छत्तरसिंह चौहान, रणसिंह मान यांच्या ठिकाण्यांवरही कारवाई केली जात आहे.

काय आहे प्रकरण
- अशी माहिती आहे की हुड्डा सरकारच्या काळ्यात तीन गावांमध्ये जवळपास 400 एकर जमीन अधीग्रहित केल्यानंतर बिल्डरांना विकण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी छापे टाकले जात आहेत.
- सप्टेंबर 2015 मध्ये अज्ञात अधिकारी आणि अज्ञात लोकांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
- अशी माहिती आहे की माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या कार्यकाळात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया झाली होती. या प्रकरणात पहिला गुन्हा गुडगाव पोलिसात दाखल झाला होता. त्यानंतर सरकारने सीबीआयकडे तपास सोपवला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हुड्डा यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी
बातम्या आणखी आहेत...