आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Officials Raid Himachal CM Virbhadra Singh’s Residence

हिमाचलच्‍या मुख्‍यमंत्र्यावर गुन्‍हा दाखल, मुलीच्‍या लग्‍नात सीबीआयचे छापे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड - उत्‍पन्‍नापेक्षा जास्‍त संपत्‍ती आढळल्‍याने सीबीआयने आज (शनिवार) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्‍या घरावर छापा मारला. दरम्‍यान, वीरभ्रद यांच्‍या मुलीचे फरीदकोटचे रवि इंद्र यांच्‍यासोबत लग्‍न होत होते. त्‍यामुळे घरात पाहुण्‍यांच्‍या सरबराईची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. मात्र, कार्यक्रमादरम्‍यानच सीबीआयने मुख्‍यमंत्री वीरभ्रद यांच्‍या घराला सिल ठोकले. परिणामी, पाहुणे आणि यजमानांचा चांगलाच गोंधळ उडाला.
11 ठिकाणी मारले छापे
सीबीआयने मुख्‍यमंत्र्यांच्‍या शिमला येथील घरांसह 11 ठिकाणावर छापे मारले. यात दिल्‍लीचे घर आणि कार्यालयाचाही समावेश आहे. दरम्‍यान, त्‍यांच्‍या विरोधात भ्रष्‍टचाराचा गुन्‍हाही दाखल करण्‍यात आला असून, भाजपने त्‍यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी केली आहे.
काय आहेत आरोप?
केंद्रीय कायदा मंत्री असताना वीरभद्र यांनी उत्‍पन्‍नापेक्षा अधिक संपत्‍ती जमवल्‍याचा त्‍यांच्‍यावर आरोप आहे. त्‍यामुळे सीबीआयसयह ईडीचे एकूण 18 अधिका-यांनी त्‍यांच्‍या घरावर छापे मारलेत. भाजपने वर्ष 2014 मध्‍ये हिमाचल प्रदेश सीबीआईचे संचालक रंजीत सिन्हा यांना पत्र पाठवून वीरभ्रद यांच्‍या गैरव्‍यहाराबद्दल माहिती दिली होती.
वीरभद्र यांनी काय म्‍हटले ?
सुड भावनेने आपल्‍यावर या प्रकारे कारवाई केली जात आहे. यापूर्वीसुद्धा दोन वेळा असे झाले. मात्र, आपण निर्दोष सुटलो. आताही तसेच होणार आहे.