आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBI Recovers Rs 3.5 Cr In Cash, 5 Kg Gold From Tapas Dutta, Principal Commissioner, IT

प्राप्तीकर आयुक्ताच्या घरात मोठे घबाड; CBI ने जप्त केले 3.5 कोटी रोख, 5 किलो सोने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- प्राप्तीकर विभागाचे आयुक्त तापस दत्ता यांच्या रांची, कोलकाता आणि नवी दिल्ली येथील ‍मालमत्तांवर सीबीयच्या अधिकार्‍यांनी एकाच वेळी छापा टाकला. दत्ता यांच्या रांची येथील घरात मोठे घबाड सापडले आहे. सीबीआयच्या अधिकार्‍यांनी 3.5 कोटी रुपये रोख आणि 5 किलो सोने जप्त केले आहे. सीबीआने दत्ता यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सूरु आहे. हवाला आणि बनावट कंपनीप्रकरणी सीबीआयने बुधवारी रांची आणि कोलकाता येथील अनेक ठिकाणी छापेमारी केली.

30 ठिकाणी धाडसत्र...
- सीबीआयच्या अधिकार्‍यांनी रांचीसह कोलकाता आणि दिल्लीत केलेल्या धाडसत्राची पत्रकार परिषदेत माहिती दिली.
- सीबीआयने एकूण 30 ठिकाणी छापे टाकले. दिल्लीतील काही ठिकाणांची माहिती गोपनिय ठेवण्यात आली आहे.
- प्राप्तीकर विभागाचे आयुक्त तापस दत्ता यांच्या रांची येथील घरावर छापा टाकला. तापस दत्ता यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
- रांचीशिवाय तापस दत्ता यांच्या कोलकातामधील अलीपूर येथील घर 19 बी, शिवम अपार्टमेंटमध्येही छापा टाकला.
- तापस दत्ता यांच्याकडे मोठी बेहिशेबी मालमत्ता असल्याची गोपनिय माहिती सीबीआयला मिळाली होती.

पुढील स्लाइडवर पाहा...संबंधित घटनेचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...