आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोफोर्स प्रकरणी सरकारने SC मध्ये याचिका दाखल करण्याची परवानगी द्यावी - सीबीआय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2005 मध्ये हायकोर्टाने हिंदूजा बंधूंविरोधातील एफआयआर रद्द केले. - Divya Marathi
2005 मध्ये हायकोर्टाने हिंदूजा बंधूंविरोधातील एफआयआर रद्द केले.
नवी दिल्ली - बोफोर्स प्रकरणी काँग्रेसच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात. या प्रकरणात सीबीआयने मोदी सरकारला एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये सीबीआयने सरकारकडे बोफोर्स प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. 2005 च्या एका निर्णयावर ते विचार करणार आहेत. तसेच कथित घोटाळ्यात FIR रद्द करण्यास आव्हान देणार आहेत. 

काय होते यापूर्वीचे आदेश
>> वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अॅन्ड ट्रेनिंग विभागाला हे पत्र पाठवले आहे. त्यामध्ये दिल्ली हायकोर्टाच्या 31 मे 2005 च्या निकालास आव्हान देण्यासाठी सुप्रीम कोर्टात SLP दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. त्यामध्ये युरोपात राहणाऱ्या हिंदूजा बंधूंविरोधातील आरोप रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. 
>> सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सीबीआयने 2005 मध्ये सुद्धा ही याचिका दाखल करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली होती. मात्र, तत्कालीन यूपीए सरकारने त्यांची विनंती फेटाळून लावली होती. 
बातम्या आणखी आहेत...