आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलच्या बदल्यात जमीन घोटाळ्यात लालू-तेजस्वींना समन्स, CBI करणार पिता-पुत्रांची चौकशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि त्यांचे चिरंजीव माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. पिता-पुत्राची दिल्लीत सीबीआय ऑफिसमध्ये वेगेवगेळी चौकशी होणार आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या राहात्या घरी दीर्घ प्रश्नोत्तरे झाली होती. सीबीआय 11 सप्टेंबर रोजी लालू आणि 12 सप्टेंबरला तेजस्वींना प्रश्न विचारणार आहे. 
 
सीबीआयने 5 जुलै रोजी एफआयआर दाखल केला
- सीबीआयने 5 जुलै रोजी या प्रकरणात लालू यांच्यासह 7 जणांविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यात आरोप आहे की लालू यादव यांनी रेल्वे मंत्री असताना पदाचा गैरवापर करत भूखंड मिळवला होता. 
- लालूंनी मेसर्स सुजाता हॉटेल्स आणि डिलाइट मार्केटिंग यांच्यासोबत हातमिळवणी करुन धोकेबाजी केली आणि गुन्हेगारी षडयंत्र रचले होते. 
 
तपास संस्थांनी मारले छापे 
- सीबीआयने याच वर्षी लालू यादव यांच्या 12 ठिकाणांवर 7 जुलै रोजी छापे टाकले होते. पाटणा, रांची, भुवनेश्वर, दिल्ली आणि गुडगाव येथील त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले होते. पाटण्यात लालू-राबडीदेवी यांच्या राहात्या घराचीही झाडाझडती घेण्यात आली होती. 
- तपास संस्थांनी सांगितल्यानुसार, 2006 मध्ये लालू यादव रेल्वेमंत्री असताना रांची आणि पुरी येथे हॉटेलचे टेंडर वाटपात घोटाळा केला होता. 
 
सीबीआयच्या FIR मध्ये ही नावे 
1) लालू प्रसाद यादव- तत्कालिन रेल्वेमंत्री
2‌‌) राबडीदेवी- लालूंची पत्नी
3) तेजस्वी प्रसाद यादव- बिहारचे माजी उपमुख्यमंत्री 
4) सरला गुप्ता- आरजेडी नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ताची पत्नी
5) पी.के. गोयल- माजी व्यवस्थापकीय संचालक, आयआरसीटीसी 
6) विजय कोचर- हॉटेल चाणक्यचे मालक आणि कंपनीचे संचालक 
7) विनय कोचर- सुजाता हॉटेल्स कंपनीचे संचालक आणि विजय कोचरचा भाऊ  
8) मेसर्स लारा प्रॉजेक्ट्स-  पाटण्यात मॉलसाठी जमीन खरेदी करणारी यादव कुटुंबाच्या मालकीची कंपनी 
बातम्या आणखी आहेत...