आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Summons Trinamool Congress General Secretary Subrata Bakshi

सीबीआयकडून तृणमूल सरचिटणीसाला नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गुन्हे शाखेने शारदा घोटाळा प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या सरचिटणीसाला फेरनोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये त्यांनी पक्षाच्या अकाउंटचे विवरण मागितले आहे. सीबीआय सूत्रांनुसार, तृणमूलचे सरचिटणीस सुब्रता बक्षी यांना नोटीस पाठवण्यात आली.

पक्षाचा २०१० - २०१३ मधील पक्षनिधी आणि खर्चाचे विवरण देण्यासाठी आठवडाभराचा अवधी देण्यात आला आहे. कागदपत्रांच्या छाननीनंतर बक्षी आणि तृणमूल नेते मुकुल रॉय यांची चौकशी करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे सीबीआय सूत्रांनी सांगितले. शारदा घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते अडकले असल्याचे समोर येत असून यात बक्षी यांची भर पडली आहे.