रायपूर - सीबीएसईच्या शाळांमध्ये प्रायमरीत शिकणा-या विद्यार्थ्यांच्या नोटबुकमध्ये गुड, व्हेरी गुड, व्हेरी बॅड िकंवा पुअर अशा शे-यांऐवजी स्माइली फेसचा वापर केला जाईल. म्हणजे मुलाने चांगली प्रगती किंवा कामगिरी केली असेल तर त्याला स्माइली चेहरा िमळेल. तर खराब कामगिरी करणा-या मुलाला भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा देणारा फेस दिला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत मुलाच्या नोटबुकवर व्हेरी बॅड िकंवा पुअरसारखा शेरा यापुढे दिसणार नाही.
सीबीएसईने यासंदर्भात सर्व शाळांना दिशानिर्देश जारी केले आहेत. याचा उद्देश मुलांना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करणे व त्यांना आनंदी ठेवणे हा आहे. मनोविश्लेषक डॉ. इला गुप्ता यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये देण्यात आलेल्या शे-यांचा मुलांच्या मनावर खोलवर परणिाम होत असतो. जेव्हा त्यांना गुड किंवा व्हेरी गुड असा शेरा मिळतो तेव्हा ते खूप खुश होतात. परंतु बॅड, पुअर अथवा व्हेरी बॅड असा शेरा िमळतो तेव्हा ते दिवसभर अस्वस्थ असतात. नकारात्मक शेरा दिला जाऊ नये. कारण मुलांच्या आईवडिलांवरही त्याचा वाईट परिणाम होतो. अनेक शाळांमध्ये रिमार्कऐवजी कार्टून कॅरेक्टर वापरून मूल्यांकन दर्शवले जाते. सीबीएसईचा हा िनर्णय स्वागतार्ह असून त्याचा चांगला परणिाम दिसून येईल, असे शैक्षणिक वर्तुळात म्हटले जात आहे.
स्माईली फेस दिल्याने मुले सकारात्मक विचार करतील. सीबीएसईचा हा िनर्णय स्वागतार्ह असून त्याचा चांगला परणिाम दिसून येईल. स्माईली फेस दिल्याने मुले सकारात्मक
विचार करतील.
चांगला िनर्णय आहे
मुलांना पुअर, व्हेरी बॅड असा रिमार्क दिल्याने ते स्वत: अस्वस्थ होतात व पालकांनाही परेशान करतात. त्याऐवजी त्यांना स्माइली फेस देणे हा एक चांगला निर्णय आहे.
डॉ. कविता खुल्लर, प्राचार्या