आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील 75 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे सहज होऊ शकतात हॅक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा- सुरक्षा व्यवस्थेसाठी क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) लावण्याचा विचार करत असाल, तर ते हॅक होऊ शकतात, हेसुद्धा लक्षात ठेवा. कारण चोरी करण्यासाठी आलेले बदमाश सर्वात आधी कॅमेरेच बंद करत आहेत.

स्वस्तातील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करणे सोपे आहे. त्यानंतर त्यातील रेकॉर्डिंगही पाहता येते, डिलिट करता येते तसेच कॅमेरा ऑफदेखील केला जाऊ शकतो. ब्रँडेड कॅमेर्‍यांची हॅकिंग कठीण आहे, मात्र त्यांची किंमत नॉन ब्रँडेड कॅमेर्‍यांपेक्षा तीन पटीने जास्त आहे. त्यामुळे त्यांची विक्रीही कमी होते. संरक्षणविषयक संशोधन करणार्‍या कोटा येथील हसन इंफोगीक यांनी सीसीटीव्ही यंत्रणेतील या त्रुटींवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यांनी लष्करासह अनेक सरकारी संस्थांमध्ये काम केले आहे. दिल्ली तसेच अनेक विद्यापीठांत कॉम्प्युटर सिक्युरिटी विषय शिकवला आहे. इंटरनेटशी निगडित 77 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केले जाऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सायबर कायद्याच्या वकील कर्णिका सेठ आणि माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ प्रतीक शुक्ला यांनीही त्यांच्या दाव्याचे सर्मथन केले आहे. हॅकिंगच्या तक्रारींनी वैतागलेले सीसीटीव्ही डीलर कपिल मंगल म्हणतात, ‘ग्राहकांना स्वस्त सीसीटीव्ही हवा असतो, मग आम्ही काय करणार?’

अशा सापडल्या उणिवा : हसन यांनी कोटातील 5 कारखान्यांतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर मालकाच्या परवानगीने प्रयोग केले. 2 महिन्यांनंतर तपासणीदरम्यान त्यांनी डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) मधील ऑथेंटिकेशन सिस्टिम बायपास केली. कंपन्यांनी डिफॉल्ट पासवर्ड ठेवला होता. त्यामुळे सर्व कॅमेरे आणि डीव्हीआर हॅक केले गेले.
इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटीसाठी कायदा नाही : सायबरतज्ज्ञ इरफान शकील यांच्या मते, ‘भारतात प्रायव्हेट सिक्युरिटी रेग्युलेशन अँक्ट-2005’ अस्तित्वात आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स सिक्युरिटी डिव्हाइस या कायद्याला अपवाद आहेत. त्यामुळे कोणतीही कंपनी सिक्युरिटी सिस्टिम विकू शकते.’

ब्रँडेड कॅमेरे
6000 रुपये - ब्रँडेड डीव्हीआर
14,000 रुपये- चार कॅमेर्‍यांचा सेट

नॉन ब्रँडेड व ब्रँडेडमधील फरक
>नॉन ब्रँडेड कॅमेरे 2000 रुपये
>नॉन ब्रँडेड डीव्हीआर 5000 रुपये
>चार कॅमेर्‍यांचे सेट 13,000 रुपये

77 टक्के नॉन ब्रँडेड
23 टक्के ब्रँडेड