आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने साधला भारतीय गावांवर निशाणा; एका महिलेचा मृत्यू, नऊ जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. काश्मीरच्या काठुआ, सांबा आणि हीरानगर सेक्टरमध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरु असलेली फायरिंग शनिवारी दुपारपर्यंत थांबलेली नाही. पाकिस्तानने बीएसएफ चौक्यांशिवाय सीमेलगतच्या गावांवरही निशाणा साधला आहे. यात मंगूचक येथे एका महिलेचा मृत्यू झाला तर, नऊ जण जखमी झाले आहेत. काश्मीरमधील बीएसएफच्या 10 ते 15 चौक्यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी लक्ष्य केले होते. बीएसएफने पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात पाकिस्तानचे पाच रेंजर ठार झाले.
पाकिस्तान लष्कराने नव्या वर्षाच्या पहिल्यादिवशी आणि बुधवारी बीएसएफच्या 13 चौक्यांना लक्ष्य केले होते. सीमाभाग असलेल्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून फायरिंग करण्यात आली. मध्यरात्री 12 वाजतापासून सुरु झालेली फायरिंग पहाटे सहा पर्यंत सुरु होती.
भारताने दिले चोख उत्तर
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत आले आहे. बुधवारीही त्यांनी हा कित्ता पुन्हा गिरवल्यानंतर भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे चार रेंजर्स मारले गेले. दुसरीकडे पाकिस्तानने भारतावरच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.