आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ceasefire Violation At RS Pura Sector, Jammu & Kashmir

पाकिस्तानकडून बीएसएफ चौकीवर गोळीबार, एक जवान शहीद; तीन जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. सीमेपलिकडून जम्मुच्या आरएस पूरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. तीन जण जखमी आहेत. शहीद जवानाचे नाव कॉन्स्टेबल संजय धर असल्याचे सांगितले जात आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले, 'पाकिस्तानी रेंजर्सने बीएसएफच्या चौकीवर सकाळी साधारण 11 वाजता हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी बीएसएफ जवानाला जम्मूच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.'

चार महिन्यात 20 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत आले आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानकडून जम्मूच्या पुंछ सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांना निशाणा बनवण्यात आले होते. सीमेपलिकडून मोर्टर आणि रॉकेट लॉन्चर्सचे हल्ले होत आहेत. या हल्ल्यांना भारतीय जवानांनीही वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे. एप्रिल पासून आतापर्यंत एलओसीवर 20 हून अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे.