आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ceasefire Violation By Pakistan Hours After Flag Meeting, Three BSF Posts Targeted

फ्लॅग मिटींगनंतर 12 तासांच्या आतच पाकिस्तानने पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेले भारतीय जवान.

जम्मू - पाकिस्तानने गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. बुधवारी भारत पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये फ्लॅग मिटींग झाली. त्यानंतर 12 तासांच्या आत पाकिस्तानने पहाटे चार वाजेच्या जवळपास अखनूर सेक्टरमध्ये फायरिंग करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने बीएसफच्या तीन चौक्यांना लक्ष्य केले होते. सुमारे दोन तास पाकिस्तानने फायरिंग केली.
त्याआधी रात्री बारा वाजेच्या सुमारास पाकिस्तानच्या सीमेतून 9-10 दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण बीएसएफने चोखपण प्रत्युत्तर देत त्यांचा प्रयत्न हाणून पाडले. पाकिस्तानकडून या चौक्यांवर छोटी शस्त्रास्त्रे आणि मशीन गनद्वारे हल्ला करण्यात आला. जम्मूच्या ज्या भागात फ्लॅग मिटींग झाली त्याचठिकाणी गोळीबार झाला.

गेल्या आठवडाभरात पाकिस्तानकडून सुमारे वीसपेक्षा अधिक वेळा श्स्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचा दावा भारताकडून करण्यात आला आहे. 1971 पासून आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर फायरिंग कधीही झाली नव्हती असे सीएसएफचे प्रमुख डी.के.पाठक यांनी सांगितले.