आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामुलामध्ये शस्त्रसाठ्यासह दहशतवाद्याला अटक, LoC वर पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा/जम्मू - खरे शूर नजरेला नजर भिडवत, छातीठोकपणे लढतात, राजनाथ सिंह यांचा पाकवर हल्लाबोल राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकवर हल्ला चढवला आहे. पाकिस्तानने छुपे युद्ध पुकारले आहे. पण जे खरे वीर असतात ते छातीठोकपणे नजरेला नजर भिडवून लढत असतात, असे राजनाथ म्हणाले. नोएडा येथे आयोजित इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) च्या रेजिंग परेड कार्यक्रमात राजनाथ यांनी पाकवर ही टीका केली. आईटीबीपीच्या उपस्थितीत कोणताही देश भारतावर हल्ला करण्याचा विचारही करू शकत नाही, असेही राजनाथ म्हणाले.

दरम्यान बारामुलामध्ये शस्त्रसाठ्यासह जैश ए मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याआधी पाकिस्तानकडून गुरुवारी सायंकाळपासून एलओसीवर जवळून रात्रभर फायरिंग करण्यात आली. पाकिस्तानी रेंजर्सने भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केले. बीएसएफनेही 10 पटीने त्याचे प्रत्युत्तर दिले. रिपोर्ट्सनुसार, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संपूर्ण परिस्थितीबाबत BSF च्या महासंचालकांशी चर्चा केली आणि जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सांगितले.
अखनूरच्या केरीमध्ये 5 जवान जखमी झाले असून, त्यांना एअरलिफ्टच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले आहे. NSA अजित डोभाल यांनाही हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी एलओसीला लागून असलेल्या सुंदरबानी आणि पल्लनवाला सेक्टरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने 56 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
एकाच्या प्रत्युत्तरात 10 मोर्टारचा मारा करण्याच्या BSF ला सूचना
- बीएसएफने केलेल्या प्रत्युत्तरातील कारवाईत पाकिस्तानलाही मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार LoC वर पाकिस्तानचे अनेक टॉवर उध्वस्त झाले आहेत.
- पाकच्या ताब्यात असलेल्या काश्मिरमधील अनेक गावांत आग लागल्याचे वृत्तही आहे. रात्रीच्या अंधारात पाकिस्तानी रेंजर्सला नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स आल्याचेही पाहायला मिळाले.
- पाकिस्तानात दोन ठार तर 11 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
- काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय चौक्यांर हल्ल्यामागेही दहशतवाद्यांचा हात आहे. मोर्टारद्वारेही हल्ला केला जात आहे. एलओसीच्या अत्यंत जवळ पाकचे जवान तैनात असल्याची माहिती मिळाली आहे.

हल्ल्यामागचे कारण..
- पाक आर्मीचे कमांडो एलओसीवर लावलेल्या कुंपनापर्यंत पोहोचले होते.
- 29 नोव्हेंबरला निवृत्त होण्यापूर्वी पाकच्या लष्कर प्रमुखांना काहीतरी मोठी कारवाई करून दाखवायची आहे.
- पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइकचा बदला घ्यायचा आहे. दिवाळीच्या वेळी पाककडून नेहमीच अशी कारवाई केली जाते.
- LoC च्या तंगधार, मेंढर, आरएस पुरा, अरनिया, अखनूर आणि सांबामध्ये भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आले.
- पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखताना गेल्या 24 तासांत 2 जवान शहीद झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...