आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुंछमध्ये पाकिस्तानचा पुन्हा वस्त्या, भारतीय चौक्यांवर गोळीबार; भारताचे जशास तसे उत्‍तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- पाकिस्तानी सैन्याने बुधवारी जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील पुंछ भागात पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नागरी वस्त्या व भारतीय सैन्याच्या चाैक्यांवर गाेळीबार केला.

नियंत्रणरेषेवरील भागात पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे  उल्लंघन केले. पुंछ भागात पाकिस्तानच्या सैन्याने बेछूट गाेळीबार केला. तसेच पाकिस्तानच्या या अागळिकीला भारतीय सैन्यानेदेखील जशास तसे उत्तर दिले, असे भारतीय सैन्याच्या सूत्रांनी सांगितले.

पाक सैन्याने १३ अाॅगस्ट राेजी नाैशेरा, मनकाेटे अादी भागात केलेल्या गाेळीबारात तीन भारतीय जवान जखमी झाले. तसेच १२ जुलै राेजी पाक सैन्याने क्रिश्नाघाटी व पुंछ भागात केलेल्या प्रचंड गाेळीबारात एक अधिकारी व महिला ठार झाली हाेती. १२ अाॅगस्टला केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात राकियाबी नावाची ४० वर्षीय महिला व नायब सुभेदार जगरामसिंह ताेमर हे दाेघे ठार झाले हाेते. ८ अाॅगस्ट राेजी केलेल्या गाेळीबारात शिपाई पवनसिंग सुगरा हे गंभीर जखमी झाले हाेते, तर ७ अाॅगस्टला बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागात केलेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला हाेता. यासह ६ अाॅगस्ट राेजीदेखील पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले हाेते.

२०१७ मध्ये पाकिस्तानी लष्कराकडून अशा प्रकारे अागळीक हाेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतरही पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...